आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi's Rally In Ramlila Maidan In Delhi, Security Arrangements Made News And Update

नागरिकत्व कायद्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरवण्यात आले, कायदा तुमच्या उज्वल भविष्यासाठीच आहे- नरेंद्र मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॅलीमध्ये अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीदेखील येणार

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीली मैदानात नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, अनेकतामध्ये एकता हीच आपल्या देशाची विशेषता आहे. मोदींनी दिल्लीतील 40 लाख अनधिकृत कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालकी हक्कासाठी आश्वासन दिले.


येत्या फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदींनी सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली. शिवाय त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावरही जोरदार टीका केली. "कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही. आम्ही काम करत होतो तर त्यात आडकाठी आणण्याचे काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झाले नाही. कारण, समस्या तशाच ठेवणं, हे आमच्या संस्कारात नाही, असा टोला मोदींनी लगावला.
यावेळी मोदी म्हणाले की, "आयुष्यातून जेव्हा अनिश्चितता निघून जाते, त्याचा काय प्रभाव पडतो हे मी तुमच्या चेहऱ्यावर पाहत आहे. तुमचा उत्साह मी पाहत आहे. मला आनंद आहे की, दिल्लीतील 40 लाखांपेक्षा जास्त नागरिकांच्या आयुष्यात नवीन पाहाट आणण्याची संधी मला मिळाली. 'पंतप्रधान उदय योजने'च्या माध्यमातून तुम्हाला घर, जमीन तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संपत्तीवर मालकी अधिकार मिळून दिला जाईल.
 

‘पोलिस मदत करताना जाती-धर्म पाहत नाही’

मोदी पुढे म्हणाले की, ‘‘पोलिसांना हिंसाचारात मारले जात आहे. पोलिस कोणाचे दुश्मन नाहीत. स्वातंत्र्यानंतर देशभरात 33 हजार पोलिस शहीज झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस शहीज झाले आणि तुम्ही त्यांना मारत आहात. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा पोलिसवाले तुमची जाती, धर्म पाहत नाहीत. तुमच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मार्केटमध्ये आग लागली होती, तेव्हा पोलिसांनी अनेकांचा जीव वाचवला. त्यांनी बचाव कार्यादरम्यान पोलिसांनी लोकांना त्यांचा धर्म विचारला नाही. 100 वर्षे जुने पक्ष शांतीबद्दल बोलायला तयार नाहीत.’’

योजनांसाठी कोणते प्रमाणपत्र मागितले नाही

मोदी पुढे म्हणाले की, ‘‘आमची प्रत्येक योजना पाहा, जेव्हा उज्ज्वला योजना आली, तेव्हा 8 कोटी कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. त्यावेळेस आम्ही त्यांना जाती,धर्माचे प्रमाणपत्र मागितले नाही. मी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना विचारतो की, तुम्ही देशाला का भडकवत आहात. मागील पाच वर्षात आमच्या सरकारने 1.5 कोटी गरिबांना घर दिले. आम्ही कोणालाच त्यांची जात,धर्म विचारला नाही. देशाची दिशाभूल केली जात आहे. पण, विरोधक डॉक्युमेंट्सच्या नावाने देशाची दिशाभूल करत आहेत. आम्ही कधीच कोणत्या योजनेसाठी डॉक्यूमेंट्सची मागणी केली नाही. मोफत वीजेसाठी, उज्ज्वला योजनेसाठी, घरकुल योजनेसाठी आम्ही गरिबांच्या झोपडीत गेलो. आम्ही कधीच कोणाला विचारले नाही, तुम्ही मंदीरात जाता, मशीदीत जाता का गुरुद्वारामध्ये जाता. जगातील सर्वात मोठी हेल्थ स्कीम आज भारतात सुरू आहे. देशातील 50 कोटींपेक्षा जास्ज गरिबांसाठी 5 लाखांचा विमा दिला. पण, राजकीय कारस्थानामुळे दिल्लीत ही स्कीम लागू होऊ शकली नाही.’’

‘विरोधकांचे राजकारण मला समजले आहे’

मोदी पुढे म्हणाले की, ‘‘त्यांनी देशाला अराजकतेकडे ढकलले. मुलांची शाळा, बस, ट्रेनवर हल्ले केले. लोकांची दुकाने, सायकल, मोटारसायकलला जाळले. भारतातील करदात्यांच्या पैशांपासून बनवलेल्या सार्वजनिक साधनांना नुकसान पोहचवले. यांचे उद्देश आणि राजकारण देशाला चांगलंच माहित आहे. जेव्हा मी पहिल्यांदा निवडणूक आलो, तेव्हा त्यांना धक्का बसला. दुसऱ्यांदा निवडणु येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. पण, देशातील जनतेने आधीपेक्षा जास्त आशीर्वाद दिला. तुम्हीच मोदीला या पदावर बसवले आहे, तुम्हाला राग काढायचा असेल तर मोदीवर काढा, मोदीचे पुतळे जाळा, मोदीला बुट-चप्पल मारा, गरीबांना त्यांच्या साधन संपत्तीला नुकसान पोचवू नका.

‘समस्येला ताटकाळत ठेवणे आमची वृत्ती नाही’

पुढे मोदी म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाच्या मदतीने दिल्लीतील 1700 पेक्षा जास्त कॉलन्यांची बाउंड्री चिन्हीत करण्याचे काम झाले आहे. कॉलन्यांचे नियमितकरण करण्याचा निर्णय घराशी निगडीत आहेच, पण हा येथील व्यवसायालाही गती देणारा आहे. समस्यांना ताटकाळत ठेवणे ही आमची प्रवृत्ती नाही. हे आमचे संस्कार नाहीत.’’ ‘‘ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला होता, ते आज काय करत आहेत, हे दिल्लीकरांनी समजून घ्यावे. या लोकांनी दिल्लीतील सर्वात आलीशान परिसरातील 2000 पेक्षा जास्त बंगले आपल्या जवळच्या व्यवसायिकांना दिले. या बंगल्यांच्या बदल्यात कोणाला काय मिळाले, का झाले असे, कसे झाले, त्याबद्दल मला आता बोलण्याची इच्छा नाही. आधीच्या सरकारने या बंगल्यात राहणाऱ्या लोकांना सर्व काही दिले पण, या कॉलनीत राहणाऱ्या गरीबांना काहीच दिले नाही. जेव्हा मी त्यांच्यासाठी काही करू लागलो, तेव्हा त्यांनी माझ्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माहिती नाही, त्यांच्यासमोर मोदी उभा आहे. आम्ही ते सर्व बंगले रिकामे करुन घेतले आणि 40 लाख लोकांना त्यांचा हक्क मिळून दिला.’’

‘दिल्लीमध्ये 5 वर्षात मेट्रोची 116 किमी नवीन लाइन सुरू झाली’

मोदी पुढे म्हणाले, ‘‘मोठ्या राजकीय विरोधानंतरही दिल्लीत मेट्रोचे मोठे काम झाले. 2014 पूर्वी दिल्लीत 14 किमी प्रती वर्षाप्रमाणे काम सुरू होते. आम्ही आल्यानंतर राज्यात प्रगती झाली. आमच्या सरकारने 25 किमी प्रती वर्षाप्रमाणे काम केले. मागील 5 वर्षात 116 किमीचे मेट्रोचे काम झाले. 70 किमी नवीन रस्त्यांचे काम सुरू आहे. मेट्रोच्या फेज-4 चे काम फार पूर्वीच सुरू झाले असते, पण येथील सरकारने अडथळा आणल्यामुळे काम रखडले.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(रविवार) दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपा कार्यकर्त्याना संबोधित केले. दोन दिवसांपूर्वीच सुरक्षे एजंसीने मोदींवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली, त्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदानात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीबाहेरील पोलिसांच्या 20 तुकड्या रामलीला मैदानाजवळ तैनात होत्या. प्रत्येक तुकडीमध्ये कमीत कमी 70 जवान आहेत. तसेच, 20 डीसीपी रँक अधिकारी आणि स्थानिक पोलिसांचे 1000 जवानदेखील उपस्थित असतील. कार्यक्रम स्थळाच्या आसपासच्या इमारतींवर स्नायपरदेखील तैनात होते. शिवाय अँटी ड्रोन टीम आणि एनसजी कमांडोची विशेष टीम सर्व कार्यक्रमावर लक्ष ठेवले.रामलीला मैदानाजवळ दरियागंजमध्ये सीएएविरोधात आंदोलन झाले होते

मागील अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. यादरम्यान मोदींवर हल्ला करण्याची माहिती मिळाल्यानने पोलिस आणि सुरक्षा एजंसी अलर्टवर आहेत. रैलीच्या सुरक्षेसाठी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात असे ठरले की, नागरिकत्व कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनामुले सोशल मीडिावरील अफवांवर विशेष लक्ष दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...