आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या वाढदिवशी ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची भेट, कोलकाताच्या विमानतळावर मारल्या गप्पा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- मंगळवारी म्हणजेच काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. या दिवशी एक आगळा-वेगळा योगा-योग जुळून आला. नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांची कोलकाता विमानतळावर मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच या दोघींची अचानक भेट झाली.जशोदाबेन झारखंडच्या धनबादमधून परत येत होत्या, तर ममता बॅनर्जी दिल्लीला निघाल्या होत्या. जशोदाबेन यांना विमानतळावर पाहताच ममता बॅनर्जी त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या. काही मिनिटांच्या या भेटीमध्ये ममता बॅनर्जी आणि जशोदाबेन यांनी गप्पाही मारल्या. यावेळी ममता बॅनर्जींनी जशोदाबेन यांना एक साडीही भेट दिली.
 

बातम्या आणखी आहेत...