आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नॅशनल डेस्क - पंतप्रधान श्रम योगी मानधन पेन्शन योजनेच्या पात्रतेशी संबंधित नियम जारी करण्यात आले आहेत. वयाची 40 वर्षे पूर्ण केलेल्यांना आणि दुसरी एखादी पेन्शन योजना असलेल्यांना याचा लाभ घेता येणार नाही. पती किंवा पत्नीपैकी जो कुणी या पेन्शन योजनेचा लाभ घेत आहे, त्यांच्या मृत्यूनंतर मुला-मुलींना ती पेन्शन दिली जाणार नाही. ही पेन्शन योजना प्रामुख्याने असंगठित क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांना लक्षात ठेवून आणण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फायदा मोलकरीन किंवा नोकर, ड्रायव्हर, रिक्शा चालक, बांधकाम क्षेत्रातील मजूर, स्वच्छता कर्मचारी, बीडी बनवणारे कामगार, शेतमजूर इत्यादींना होणार आहे.
दरमहा मिळतील 3 हजार रुपये
- सरकारच्या या योजनेत सदस्यांना 3 हजार रुपयांचे मासिक निवृत्ती वेतन दिले जाईल.
- यात संबंधितांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये.
- सरकार आणि सब्सक्रायबर दोहोंना सम-समान शेअर पेन्शन फंडसाठी द्यावे लागतील.
15 फेब्रुवारीपासून लागू होणार स्कीम
ही योजना 15 फेब्रुवारी 2019 पासून लागू केली जाणार आहे. अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींकडे बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ही याचा लाभ घेणाऱ्यांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे.
जेवढ्या लवकर नोंदणी, तेवढा कमी प्रीमियम
> एखाद्या व्यक्तीने आधीच राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी नाव नोंदवले असेल तर त्याला पंतप्रधान श्रम योगी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही.
> पेमेंट करताना विलंब झाल्यास सब्सक्रायबरला लेट पेनल्टीसह पैसे जमा करावे लागतील. एकदा खाते उघडल्यानंतर कुणाला 10 वर्षांच्या आत बाहेर पडायचे असल्यास त्यांना तोपर्यंत भरलेली रक्कम परत केली जाईल.
या दरम्यान जमा झालेला व्याज सुद्धा दिला जाईल.
> पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यास त्यांचे पार्टनर या योजनेला सुरू ठेवू शकतील. अथवा इच्छेनुसार, जमा झालेली रक्कम घेऊन बाहेरही पडता येईल. परंतु, दोहोंचा मृत्यू झाल्यास ती रक्कम मुलांना मिळणार नाही, तर पेन्शन फंडमध्ये जाणार आहे.
> 10 कोटी लोकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होईल. एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना सुरू करत असेल तर त्याला दरमहा 55 रुपये भरावे लागतील. वयाच्या 40 व्या वर्षी योजना घेतल्यास मासिक प्रीमियम 200 रुपयांचा राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.