आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाची मोदींनी केली घोषणा, आता आयोग करणार चौकशी; जमिनीवर राजकारण : कारण निवडणुका 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए-सॅट क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिलेला संदेश हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे की नाही, याच्या चौकशीसाठी निवडणूक आयोगाने समिती नेमली आहे. 


याचे श्रेय नेहरू-इंदिरा यांना : काँग्रेस 
ए-सॅट क्षेपणास्त्राच्या यशाचे सारे श्रेय माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याकडे जाते, असा दावा काँग्रेसने केला. कारण त्यांच्याच काळात डीआरडीओची स्थापना झाली. पक्षाचे नेते अहमद पटेल म्हणाले, उपग्रहरोधी क्षेपणास्त्राचे काम माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात सुरू झाले होते. प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बसपच्या प्रमुख मायावती यांनी मोदी यांची घोषणा आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे. माकपचे सीताराम येचुरी यांनी आयोगाला पत्र लिहिले होते. 


मनमोहन सरकारने परवानगी दिली नव्हती : डीआरडीओचे माजी प्रमुख सारस्वत 
डीआरडीओचे माजी प्रमुख विजयकुमार सारस्वत म्हणाले, अग्नी-५ क्षेपणास्त्र विकसित झाल्यानंतरच ए-सॅटसाठी आपण सक्षम झालो होतो. मात्र ७-८ किमी प्रति सेकंद वेगाने भ्रमण करणाऱ्या उपग्रहाचा लक्ष्यभेद करणारे वाहन नव्हते. मनमोहन सरकारने ते तयार करण्यास मंजुरी दिली नव्हती. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, मोदी सरकारने या उपग्रहरोधी क्षेपणास्त्र चाचणीस परवानगी दिली, त्यामुळेच हे यश मिळाले आहे.


मोदींची घोषणा - आम्ही अवकाशात मोठे यश मिळवले आहे. उपग्रहरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही देशाच्या सुरक्षित विकासाचा भाग आहे. 

राहुलची टीका - या यशाबाबत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन. तसेच पंतप्रधान मोदी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा.