आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दशन करणाऱ्या बँक खातेधारकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू; खात्यात अडकले 90 लाख रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पीएमसी बँकेच्या एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. संजय गुलाटी असे खातेदाराचे नाव आहे. संजय यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याविरोधात सोमवारी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या परिवाराचे बँकेत तब्बल 90 लाख रुपये जमा होते. 
 

आधी गेली नोकरी आता बँकेत अडकले लाखो रुपये
संजय गुलाटी जेट एअरवेजमध्ये नोकरीला होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली आणि आता त्यांचे बचत देखील बँकेत जप्त आहे. संजयला फक्त थायरॉयडची समस्या होती. दरम्यान बँकेच्या खातेदारांनी सोमवारी केलेल्या निदर्शनात संजय सहभागी झाले होते. प्रदर्शनानंतर दुपारी साडेतीन वाजता घरी आले आणि झोपी गेले. सायंकाळी पावणेपाच वाजता जेवण करतेवेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
 

नेमके काय आहे प्रकरण?
बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी आरबीआयने गेल्या महिन्यात बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बँध लादले होते. याअंतर्गत खातेदारांना फक्त 1000 रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. यानंतर ही मर्यादा वाढवून 10 हजार नंतर 25 हजार आणि सोमवारी 40 हजार रुपये करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे हजारो खातेधारकांचे पैसे बँके अडकले आहेत. आरबीआय आदेशाविरोधात अनेक खातेदार आंदोलन करत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...