आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक गुन्हे शाखेकडून 5 मुख्य आरोपींच्या विरोधात 32 हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - कोट्यवधींच्या पंजाब महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँक घोटाळ्यात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी एफआयआर दाखल केला. 32 हजार पानांच्या या आरोपपत्रामध्ये 5 मुख्य आरोपींची नावे आहेत. यामध्ये बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी चेअरमन वर्यम सिंग, माजी संचालक सुरजीत सिंग अरोरा आणि एचडीआयएलचे प्रोमोटर्स राकेश वाधवन, सारंग वाधवन यांचा समावेश आहे. या सर्वांच्या विरोधात फसवणूक, पुरावे नष्ट करणे, बनावट कागदपत्रे बनवणे इत्यादी आरोप लावण्यात आले आहेत.


या सर्वच आरोपींना सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती तसेच ते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. या 5 जणांच्या व्यतिरिक्त पोलिसांनी इतर 7 माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र लवकरच कोर्टात सादर केले जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दाखल केलेल्या 32 हजार पानांच्या आरोपपत्रात फॉरेन्सिक अहवाल आणि संपत्ती खरेदीची कागपत्रे आहेत. या संपत्ती आणि इतर माध्यमातून बँकेत कशी रक्कम काढण्यात आली आणि कशी ग्राहकांसह सर्वांची फसवणूक झाली याचा तपशील मांडण्यात आला आहे. सोबतच, बँक ग्राहकांसह 340 साक्षीदारांचे जबाब सुद्धा यात नमूद आहेत.

याच वर्षी सप्टेंबरमध्ये पीएमसी बँकेचा 6700 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. दिवाळखोरीला लागलेल्या एचडीआयएलला पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर धरून कसे हजारो कोटींचे कर्ज दिले ही गोष्ट रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनात आली होती. आरबीआयनुसार, पीएमसी बँकेने 44 कर्ज खाते लपवले होते. त्यामध्ये एचडीआयएलच्या खात्याचा देखील समावेश होता. कोअर सिस्टिममध्ये छेडछाड करून केवळ मोजक्या अधिकाऱ्यांनाच त्याचे अॅक्सेस देण्यात आले होते. या प्रकरणात ईडी आणि स्थानिक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि 23 सप्टेंबर 2019 रोजी आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले.