आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेच्या ग्राहकांनी निर्मला सीतारमण यांना मुंबईतील भाजप मुख्यालयाजवळ घातला घेराव; अर्थमंत्री म्हणाल्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्माल सीतारमण गुरुवारी मुंबईत आल्या आहेत. दरम्यान सीतारमण यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत मोठे विधान केले आहे. या बँक घोटाळ्याचा सरकारचा काही संबंध नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देत असल्याचे सीतारमण यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगतिले. पत्रकार परिषदेपूर्वी बँकेच्या खातेदारांनी निर्मला सीतारमण यांना मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर घेराव घातला होता. 

यावेळी सीतारमण म्हणाल्या की, बँकेच्या ग्राहकांच्या गरजा आणि अडचणींबाबत आरबीआय गव्हर्नरसोबत बोलणार आहे. तसेच बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

पीएमसीसारख्या घटना रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यास तयारः अर्थमंत्री
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, राज्यस्तरीय सहकारी बँकांचे कामकाज सुधारण्यासाठी आवश्यक असल्यास कायद्यात सुधारणा केली जाईल. याबाबत चर्चा करण्यासाठी वित्तीय सेवा विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव लवकरच आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरची भेट घेणार आहेत.
  

पीएमसी बँकेवर 6 महिन्यासाठी आहेत निर्बंध
24 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने पीएमसीला नोटिस जारी केली होती. बँकेतील व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा सांगत पुढील 6 महिने सर्व व्यवहारावर निर्बंध घालण्यात आल्याचे RBI ने पत्रात म्हटले आहे. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाहीत, तसेच कोणत्याही ठेवी स्वीकारता येणार नाही.