आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरबीआय प्रशासकांच्या परवानगीने लाख रुपये देखील काढू शकतील ग्राहक, रिझर्व्ह बँकेची हायकोर्टात हमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तातडीच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतील ग्राहक
  • जाणून घ्या कोणत्या कारणासाठी किती रक्कम काढता येणे शक्य!

मुंबई - बुडित निघालेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसीच्या ग्राहकांसाठी आरबीआयने काहीसा दिलासा दिला आहे. आपातकालीन परिस्थितीत या बँकेतील ग्राहक तातडीने मदतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रशाकाकडे धाव घेऊ शकतात. तातडीची वैद्यकीय गरज भागवण्यासाठी अशा ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबई हायकोर्टात मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

पीएमसी बँकेतून आपलेच पैसे काढण्यासाठी ग्राहकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरच दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आरबीआयने हायकोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, लग्न समारंभ, शिक्षण, आयुष्याशी संबंधित इतर महत्वाच्या कामांसाठी पीएमसी बँकेच्या ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी विभागीय खंडपीठाचे न्यायाधीश एस.सी. धर्माधिकारी आणि आर.आय. चगळा यांच्यासमोर सांगितले, की आरबीआयने नेमलेल्या प्रशाकांकडे जाऊन 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास दाद मागितली जाऊ शकते. ही उपाययोजना बँक आणि बँकेचे ग्राहक या दोघांसाठी योग्य आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.


पीएमसी बँकेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नोंदवले आहे. 23 सप्टेंबर रोजी आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले. 6 महिन्यांसाठी लागू करण्यात आलेल्या या निर्बंधांचा सर्वात मोठा फटका येथील ग्राहकांना बसला. त्यानुसार, पीएमसी बँकेतील खातेधारकांना सहा महिन्यांत केवळ 1 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली. त्यावर ग्राहकांचा रोष लक्षात घेता ही मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंतही करण्यात आली. आता ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. या बँकेने कागदपत्र आणि नियम धाब्यावर धरून एचडीआयएलला कर्ज दिल्याचे आरोप आहेत. हेच कर्ज कालांतराने एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग अॅसेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. घोटाळा बँकेने केला, मग येथील ग्राहकांना त्रास का असा सवाल ग्राहकांकडून केला जात आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखा 4355 कोटी रुपयांच्या पीएमसी घोटाळ्याचा तपास करत आहे. याच प्रकरणात 9 जणांना अटकही करण्यात आली. सोबतच, ईडीकडून सुद्धा यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...