आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12,250 फूट उंचीवर असलेल्या गुहेत पंतप्रधानांची ध्यानधारणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लाेकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहचले. मंदिरात त्यांनी रुद्राभिषेकासह पूजा केली. दर्शनानंतर त्यांनी येथील पुनर्वसन कार्याची पाहणी केली. यानंतर त्यांनी १२,२५० फूट उंचीवरील पवित्र गुहेत ध्यानधारणा केली. महाराष्ट्रातील जय शहा यांच्यानंतर गुहेत रात्रभर थांबणारे मोदी दुसरे भक्त आहेत. रविवारी ते बद्रीनाथाचे दर्शन घेतील. 

 

हे ध्यान प्रथमच... केदारनाथमध्ये रात्रभर ध्यानधारणा करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही पहिलीच वेळ आहे. मंदिरापासून दीड किमी अंतरावर असलेली ही गुहा समुद्रसपाटीपासून १२,२५० फुटांवर आहे. 

 

> 3 मे 2017 मोदी यांनी भक्त म्हणून प्रथम केदारनाथाचे दर्शन घेतले होते.

> 20 ऑक्टोबर २१ ऑक्टोबरला मंदिर बंद होणार होते. त्याआधी एक दिवस दर्शन घेतले.

> 7 नोव्हेंबर 2018 दिवाळीनिमित्त मोदी या देवस्थानी आले. मंदिरात पूजा केली.

बातम्या आणखी आहेत...