आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या संसद अधिवेशनात गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आक्रमक शैलीत उत्तर दिले. साडेचार वर्षांत सरकारने केलेल्या कामांचे दाखले देत मोदींनी काँग्रेसवर प्रचंड टीका केली. संरक्षणविषयक करारांपासून ईव्हीएमपर्यंत सर्व विषयांवर भाष्य करताना काँग्रेसने आपण सत्तेत असतानाचा भूतकाळ तपासावा, असे आव्हान त्यांनी दिले. 'देश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच, ज्यांनी देशाला लुटले आहे त्यांना घाबरावेच लागेल' अशा शब्दांत मोदींनी काँग्रेससह विरोधकांना सुनावले. आपण पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावाही त्यांनी केला. संसदेच्या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पंतप्रधान मोदी यांनीही संसदेत अगदी जाहीर सभेत बोलत असल्याच्या थाटात भाषण केले.
मोदींचे संसदेत दावे...
भारतीय अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचली. ११ व्या स्थानावर असताना ज्यांना अभिमान होतो त्यांना आता अभिमान का वाटत नाही ? जगाला मेक इन इंडियाची ताकद भारताने दाखवली. भारत स्टील निर्मिती करणारा जगातील दुसरा मोठा देश झाला. भारत आज जागतील चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर देश आहे. मेक इन इंडियामुळे जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट भारतात. इंटरनेटचा सर्वाधिक वापरही.
हवाईदल दुबळे व्हावे हीच काँग्रेसची इच्छा : हवाईदल दुबळे व्हावे हीच काँग्रेसची इच्छा असल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, काँग्रेसने सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत. उलट २०१६ मध्ये आम्ही सैनिकांसाठी ५० हजार आणि २०१७ मध्ये १ लाख ८६ हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.