आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB घोटाळाः भारतात परतण्यास मेहुल चौकसीचा नकार; म्हणाला, जबाबासाठी तपास संस्थांनीच एंटिगुआला यावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधींचा चुना लावून परदेशात फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चौकसीने भारतात येण्यास नकार दिला आहे. ईडी (अंमलबजावणी संचलनालय) समोर बोलताना त्याच्या वकिलांनी मेहुल तीन महिने भारतात येऊ शकणार नाही असे शनिवारी सांगितले आहे. सोबतच, मेहुलचा जबाब नोंदवायचा असल्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनीच एंटिगुआला जावे किंवा त्याचे आरोग्य दुरुस्त होण्याची प्रतीक्षा करावी. सद्यस्थितीला सुनावणी किंवा उपस्थितीसाठी तो फिट नाही असे त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त कोर्टात व्हिडिओ काँफ्रन्सिंगने तो सुनावणीला हजर होऊ शकतो. असा पर्याय सुद्धा त्याच्या वकिलांनी ठेवला आहे. 


ईडीने मुंबईतील न्यायालयात मेहुल चौकसीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. पंजाब नॅशनल बँकेतून जवळपास 13 हजार 400 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी मेहुल आणि त्याचा भाचा नीरव मोदी मुख्य आरोपी आहेत. मेहुल सध्या एंटिगुआचे नागरिकत्व घेऊन तेथे राहत आहे. तर भारतीय तपास संस्था त्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी झालेल्या एका सुनावणीमध्ये कोर्टाने ईडीला आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. 

 

यापूर्वी केला होता अशा आजारांचा उल्लेख
मेहुलने एका शपथ पत्रावर लिहिले होते, की 2012 पासून त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. त्याला गेल्या 20 वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. या व्यतिरिक्त तो हृदयरोग पीडित आहे. एवढ्या आजारांमुळे आपण एंटिगुआ ते भारत असा 41 तासांचा हवाई प्रवास करू शकत नाही. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात मेहुलचा भाचा नीरव मोदीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुद्धा विशेष न्यायालयात अशाच स्वरुपाचा शपथपत्र दाखल केला. फरार घोषित करण्यापासून ईडीला कसे रोखता येईल त्याचा तो प्रयत्न करत होता.

 

बातम्या आणखी आहेत...