आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार शनिवारपासून अंमलात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी विद्यापीठाला प्राप्त झाली अाहे. या नामविस्तारानिमित्त आनंद सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच घेतला जाणार आहे. 


नागपूर येथे गेल्या महिन्यात झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात अाले होते. ११ ऑगस्ट रोजी हा नामविस्तार करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशनाच्या काळात केली होती. नामविस्ताराची अधिसुचना विद्यापीठाला शुक्रवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार शनिवारपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नाविस्तार करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...