आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याहारीत पोहे खाणे फायदेशीर, होतील खास आरोग्य लाभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोह्यामध्ये शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ते खाल्ल्याने शरीराला पुढील तीन फायदे मिळतात.

ऍनिमिया होत नाही
१०० ग्रॅम पोह्यामध्ये २० मिलिग्रॅम लोह असते. यामुळे अशक्तपणा असलेल्या लोकांना पोहे खाण्याचा सल्लाही दिला जातो. ऊर्जेची पातळी राखण्यास, लक्ष केंद्रित करण्यास, रोगप्रतिकारक यंत्रणा निरोगी ठेवण्यास आणि शरीराचे योग्य तापमान राखण्यास मदत होते. त्याचबरोबर हेल्दी गर्भधारणेसाठीदेखील फायदेशीर आहे.

भरपूर एनर्जी
पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळी न्याहारीत हा पदार्थ खाल्ला तर एनर्जी मिळते. पोह्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. कार्बोहायड्रेट्सच्या कमतरतेमुळे थकवा येतो त्यामुळे डोकेदुखी होते. तुमचा थकवा व अशक्तपणा दूर करण्यातही याची चांगली मदत होते.

चांगले पचन होते
पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्या होत नाहीत.पोहे पचायला एकदम हलके असतात त्यामुळे पाचनक्रियाही चांगली राहते.

बातम्या आणखी आहेत...