अहमदाबादमध्ये विवाह समारंभात विषबाधा; 100 जण रुग्णालयात
2 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
अहमदाबाद- शहरात एका विवाह समारंभात अन्नातून विषबाधा झाली. जवळपास १०० जणांनी उलट्या, मळमळ, पोटदुखी होत असल्याची तक्रार केल्यानंतर या सर्वांना वाडीलाल साराभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आता या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.