आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगरीच्या पिठातून विषबाधा : श्री गृह उद्योगच्या विक्रेत्यास पकडले 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- एकादशीच्या दिवशी खाल्लेल्या भगरीच्या पिठामुळे माजलगाव तालुक्यातील आठ गावांतील १२० ग्रामस्थांना गुरुवारी दुपारी विषबाधा झाल्याने खळबळ उडाली होती. शिंपेटाकळी येथील श्री गृह उद्योग भगर पीठ विक्रेता रामदास गंगाराम ताटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 

गुरुवारी उमरी, रोषणपुरी, कोथरूळ, छत्रबोरगाव, भाटवडगाव, माळेवाडी, नागडगाव, पारगाव, रोशनपुरीतील नागरिकांनी एकादशीच्या उपवासाच्या फराळासाठी गावातील किराणा दुकानदारांकडून भगरीचे पीठ विकत घेतले. दोन दिवसांपूर्वी एका खासगी व्यक्तीकडून या दुकानदारांनी भगरीचे पीठ खरेदी केले होते. या पिठाच्या भाकरी खाल्ल्याने आठ गावांमधील सुमारे १२० ग्रामस्थांना उलटी जुलाब होण्याचा त्रास सुरू झाला होता. माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात आले होते. काही रुग्णांना रात्री उशिरा तर काहींना सकाळी सुटी झाली. पोलिसांनी भगरीचे पीठ विकणारा शिंपेटाकळी येथील श्री गृह उद्योग चालवणारा रामदास गंगाराम ताटे याला पकडले असून ताटे याने माजलगाव येथीलच एका दुकानदाराकडून भगर खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...