आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात फवारणी करताना सात शेतकऱ्यांना विषबाधा, अकोल्यात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सध्या पिकांना फवारणी देण्याचे काम जोरात सुरू आहे. अशातच मागील काही दिवसांपासून फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. फवारणीतून विषबाधेचे हे सत्र सुरूच आहे. अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागातून फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांना दाखल करण्यात आले. तर जिल्ह्यातील अंदुरा मधील गजानन जाणूजी इंगळे या शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. सध्या सर्वच उपचार घेतल अशलेल्या शेतकरयांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील गोरेगाव, मूर्तिजापूर, बोरगाव आणि अकोला तालुक्यातील चार शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यातील पाच शेतकरयांचा समावेश आहे. 

गजानन जाणूजी इंगळे हे मागील दोन ते तीन दिवसांपासून आपल्या शेतात फवारणी करत होते. शुक्रवारी दुपारी शेतात फवारणी करत असताना त्यांना किटकनाशकाची बाधा झाली. विषबाधा झाल्याची लक्षणे दिसताच कुटुंबियांनी त्यांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावत शोककळा पसरली आहे.