चेन्नई / प्रदूषणामुळे मरिना किनारी लाटांसोबत वाहून आला विषारी फेस; दुर्गंधी वाढू लागली

मरिना बीचवर रविवारी फिरायला गेलेले लोक त्रस्त झाले होते. मरिना बीचवर रविवारी फिरायला गेलेले लोक त्रस्त झाले होते.

  • महिनाभरात दुसऱ्यांंदा फेस, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणामामुळे चिंतेत वाढ
  • जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या बीचवर हवामान खराब

प्रतिनिधी

Dec 02,2019 09:58:00 AM IST

​​​​​​चेन्नई : प्रदूषण केवळ राजधानी दिल्लीकरांचीच समस्या राहिलेली नाही. दक्षिणेकडील चेन्नईदेखील या समस्येमुळे बेहाल आहे. गेल्या महिन्यात चेन्नईत प्रदूषण धोक्याच्या स्तरावर होते. गेल्या काही दिवसांपासून जगातील दुसरे मोठे बीच असलेल्या मरिनावरील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. लोकांना ते सहन होत नव्हते. मरिना किनारपट्‌टीजवळ राहणाऱ्या मासेमारांच्या मते, कारखाने व रुग्णालयांकडून येणारा कचरा थेट समुद्रात वाहून येतो. महिनाभरात दुसऱ्यांदा किनारपट्‌टीवर आलेल्या लाटांसोबत मोठ्या प्रमाणात विषारी फेस आल्याने लोकांची चिंता वाढली. लोक मुले-कुटुंबासमवेत बीचवर फिरायला येतात. त्यांना त्वचेचा संसर्ग होण्याची भीती वाटू लागली आहे. नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्चने येथील स्थितीवर चिंता व्यक्त केली. ते सातत्याने पाण्याच्या गुणवत्तेवर निगराणी करू लागले आहेत.


गेल्या महिन्यात यमुनेत फेसातच छटपूजा


नोव्हेंबरमध्ये छट पर्वकाळातच दिल्लीत यमुना नदीत अशा प्रकारचा विषारी फेस जमला होता. हा फेस डिटर्जंट व केमिकल वेस्टपासून तयार झालेला असल्याचे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे. बॅरेजच्या गेटमधून पाणी कोसळते तेव्हा फेस तयार होतो.


दर मिनिटाला एक ट्रक कचरा समुद्रात जातो


संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) म्हणण्यानुसार दरवर्षी सुमारे ८० लाख कचरा समुद्रात फेकला जातो. एका मोठ्या ट्रकमधील कचऱ्याबरोबर आहे. त्यात ६० ते ९० टक्के भाग प्लास्टिकच्या वस्तूंचा आहे.

X
मरिना बीचवर रविवारी फिरायला गेलेले लोक त्रस्त झाले होते.मरिना बीचवर रविवारी फिरायला गेलेले लोक त्रस्त झाले होते.
COMMENT