आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीओके भारताचा भाग, एक दिवस आमचे नियंत्रण असेल : जयशंकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीआेके) भारताचा भाग आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पीआेकेवर एक दिवस आमचे नियंत्रण असेल. पीआेकेबद्दलची भूमिका व स्थिती अगदी स्पष्ट आहे. हा भाग भारताचा अविभाज्य घटक आहे. आता पाकिस्तानशी केवळ पीआेकेबाबत चर्चा होऊ शकेल. काश्मीरवर नव्हे, अशा शब्दांत त्यांनी भारताच्या भूमिकेला मांडले. याआधी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही भूमिका स्पष्ट केली होती. कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान सातत्याने काश्मीर मुद्द्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरबाबत लोक काय म्हणतील, याची पर्वा करायची गरज नाही, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, लोकांना काहीही बोलू द्या. चिंता करू नका. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्न आहे. यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले, १९७२ पासून आपली स्थिती स्पष्ट आहे. काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा आहे आणि राहील.
 
अमेरिकेला दिसेल परराष्ट्र धोरणाचा अद्वितीय पैलू : जयशंकर म्हणाले,  आज जी-२०, ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा आवाज पूर्वीच्या तुलनेत जास्त ऐकला जातो. आपल्या परराष्ट्र धोरणाचा अद्वितीय पैलू अमेरिकेला पाहायला मिळेल. भारतीय-अमेरिकी समुदाय एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. 
 

पीओके  : पाक या भागात आंतरराष्ट्रीय मीडियाला पाऊलही ठेवू देत नाह

भूगोल : १३००० चौ किमी , ३० लाख लोकसंख्या
पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील काश्मीरचे क्षेत्रफळ सुमारे १३ हजार चौ. किमी आहे. ३० लाख लोकसंख्या आहे. त्याच्या सीमारेषा पश्चिमेस पंजाब व खैबर पख्तुनख्वाला जोडलेली आहे. उत्तर-काश्मीरमध्ये अफगाणच्या वखन कॉरिडोर, उत्तरेत चीनच्या जिंगजियांग व पूर्वेत जम्मू-काश्मीर व चीनला जोडलेल्या आहेत. पाकने पीआेकेचे प्रशासकीय स्वतंत्र काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तान असे दोन भाग पाडले. 
 
 

धोरण : स्वतंत्र संबोधते, परंतु त्यात हस्तक्षेपही करते
पाकिस्तान स्वतंत्र काश्मीर असे संबोधते. परंतु प्रत्यक्षात त्यात हस्तक्षेप करते. स्वतंत्र काश्मीरच्या नावाआडून एक पंतप्रधानही नियुक्त करते. परंतु ते इस्लामाबादचे आदेश मानते. पीआेकेची राजधानी मुजफ्फराबाद आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या आठवड्यात भारत सरकारच्या विरोधात रॅली काढली हाेती. पाकने २००९ मध्ये गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये स्वायत्त प्रांतीय व्यवस्था सुरू केली. 
 
 

दहशतवाद : कॅम्पद्वारे ४ लोक प्रशिक्षण घेतात
पीआेकेमध्ये दरवर्षी २२ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या विरोधात जाहीर सभा घेतली जाते. लोक मुजफ्फराबाद, रावळकोट, कोठ, गिलगिट आणि हजिरामध्ये निदर्शने करतात. येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केला जातो. त्यातही आंतरराष्ट्रीय मीडियाला प्रवेश नाकारतात. पाकचे येथे अड्डे आहेत. तेथे एकावेळी ४ हजार दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. भारताने येथील बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक केली होती. 
 

भारत-पाकिस्तानच्या पीएमची लवकरच भेट घेणार : डोनाल्ड ट्रम्प 
वाॅशिंगटन |लवकरच भारत व पाकिस्तान यांच्या पंतप्रधानांची भेट घेतली जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याच्या दिशेने चांगली प्रगती झाली आहे. ट्रम्प २२ सप्टेंबर रोजी ह्यूस्टनमध्ये होऊ घातलेल्या हाउडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारतीय अमेरिकींना संबोधित करतील. 

बातम्या आणखी आहेत...