आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातैपेई - भलेही लोकांमधील आता पोकेमोन गो गेमची क्रेझ संपली असेल, परंतु तैवानचे 70 वर्षीय बुजुर्ग चेन सान-युआन यांच्याबाबत असे नाहीत. चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईचे मास्टर युआन पोकेमोन गो गेमचे एवढे चाहते आहेत की, आपल्या सायकलच्या हँडलवर एकदाच ते 15-15 मोबाइल फोन अडकवून ठेवतात. तैवानमध्ये त्यांना 'हार्डकोर पोकेमोन हंटर ग्रँड पा' म्हटले जाते. प्रेमाने लोक त्यांना पोकेमोन अंकलसुद्धा म्हणतात.
नातवाने शिकवला गेम
युआन सांगतात, "मला पोकेमोन खेळणे नातवाने शिकवले. हा गेम खूप मजेदार आहे. या माध्यमातून मी लोकांशी जोडलेला राहू शकतो. सोबतच अल्जायमर्स सारख्या आजाराला रोखण्यातही यशस्वी ठरलो आहे.'' स्ट्रेट टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोकेमोन गो अजूनही सिंगापूरमध्ये खूप लोकप्रिय आहे. 2016 मध्ये गेम लॉन्च झाल्यानंतर आतापर्यंत जगभरातील लोकांनी यावर 1.8 बिलियन डॉलर (तब्बल 12 हजार कोटी रुपये) खर्च केलेले आहेत. पोकेमोन खेळण्यात तैवानचा 5वा क्रमांक लागतो. येथे यावर लोकांनी 48 मिलियन डॉलर ( 331 कोटी रुपये) खर्च केलेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.