आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोधेगावात यंदा प्रथमच साजरा होणार 'दांडूमुक्त' पोळ्याचा सण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव- वर्षभर ज्यांच्या मानेवर आपल्या संसाराचे 'जू' आहे, त्यांचे खांदे मळले जातात, स्वच्छ धुवून आंघोळ घालून साज चढवला जातो. नंतर मिरवणूक काढत पूजा केली जाते, त्या बैलांना 'दांडक्या'ने मारून पळवले जाते. यंदा मात्र बोधेगाव ग्रामपंचायतीने 'दांडूमुक्त पोळ्या'चा ठराव केला आहे. 


पोळा रविवारी साजरा होत आहे. या दिवशी सायंकाळी परिसरातील सर्व बैलांना हनुमान मंदिरासमोर एकत्र केले जाते. पाटलांच्या मानाच्या बैलांचे आगमन झाल्यानंतर सर्व शेतकरी दांडक्याने मारत आपापल्या बैलांना वेशीतून पळवत नेतात. नंतर हनुमान मंदिरास प्रदक्षिणा मारून बैलांना घरी नेले जाते. काही शेतकरी बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढतात. बैलांना होत असलेल्या मारहाणीमुळे व्यथित होऊन येथील 'राजगड प्रतिष्ठान'चे प्रमोद तांबे यांनी २५ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत 'दांडूमुक्त पोळ्या'चा ठराव मांडला. त्यास ग्रामस्थांनी संमती दिली. या ग्रामसभेस सरपंच सुभाष पवळे, माजी जि. प. सदस्य तथा उपसरपंच नितीन काकडे, सदस्य महादेव घोरतळे, रमजू पठाण, प्रकाश गर्जे, कामगार तलाठी अमर शेंडे, मंडल कृषी अधिकारी सुभाष भराट, निवृत्त मंडलाधिकारी दत्तात्रय घोरतळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण काशीद उपस्थित होते. यंदापासून बोधेगाव येथील बैल पोळा शांततेत साजरा होणार असल्याने पशुप्रेमींनी समाधान व्यक्त केले. 


दरम्यान, पुरेशा पावसाअभावी दुष्काळाचे सावट असल्याने बैल सजावटीच्या सामान खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. कर्जबाजारीपणामुळे बाजारात उत्साह नाही. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे पोळा यावर्षी काटकसरीने साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 
बैलांना न मारता शांततेत मिरवणुकीचे आवाहन 


यंदा दुष्काळाचे सावट 
यावर्षी पावसाने मोठा ताण दिल्याने उन्हाळा अजून संपलाच नसल्याचे विदारक चित्र आहे. दुबार पेरणी करूनही शेतात काही न पिकल्याने हंगाम वाया गेला असून पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने दुष्काळाच्या सावटात पोळा सण आहे.
- प्रमोद तांबे, राजगड प्रतिष्ठान, बोधेगाव. 


केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करा 
दांडूमुक्त पोळा ठरावाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात येत असून या ठरावाची प्रत सार्वजनिक ठिकाणी लावणार अाहे. त्याबाबतची उद््घोषणाही केली जाईल. सर्वांनी संमत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करत त्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
- प्रारब्ध इसारवाडे, प्रभारी ग्रामविकास अधिकारी, बोधेगाव, ता, शेवगाव. 

बातम्या आणखी आहेत...