आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकून धक्का बसेल, पण HOT मॉडेल्सच्या प्रायव्हेट पार्टपासून बनवली जात आहे Vagina Beer

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलंड  - पोलंडच्या एका कंपनीने सुंदर मॉडेल्सच्या प्रायव्हेट पार्ट्सपासून बिअर तयार केली आहे आणि लवकरच ते मार्केटमध्ये आणण्याची तयारी करत आहेत. या कंपनीने बिअर तयार करण्यासाठी व्हजाइनाच्या इसेन्सचा वापर केला आहे. या कंपनीचे नाव आहे 'द ऑर्डर ऑफ योनि'. योनि हा एक संस्कृत शब्द आहे. कंपनीच्या मते, कस्टमर्स आपल्या मनपसंत मॉडेल्सच्या बॉडी पार्टपासून बनलेल्या या (विचित्र) बिअरचा आस्वाद घेता येईल. बॉटलवर मॉडेलचे नाव आणि इतर माहिती असेल. ही बिअर मॉडेल्सच्या शरीरात निर्मिती होणाऱ्या लॅक्टिक अॅसिडपासून तयार केली जात आहे. 

 

वेबसाइटवर आहे पूर्ण माहिती...
- कंपनीची वेबसाइट orderyoni.com वर या बिअरबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांना अनोखा अनुभव देण्याचा दावा करत लिहिण्यात आले आहे की, ही बिअर प्राशनकरताच तुम्ही तुमच्या मनपसंत मॉडेलची अनुभूती घेऊ शकाल. याचा प्रत्येक घोट तुम्हाला वेगळाच अनुभव देईल. जगात कुठेही अशा प्रकारचे बिअर तुम्हाला मिळणार नाही. 
(वरील विधान हे कंपनीने आपल्या वेबसाइटवर केले आहे. चेक करू शकता.)

 

अशी बनवतात बिअर
- पुढे लिहिण्यात आले आहे की, या बिअरमध्ये मॉडेलच्या सौंदर्याचा अर्क आहे. ही बिअर बनवण्यात खूप मेहनत लागते. ही बिअर माक्रोबायोलॉजी तंत्रज्ञानाने तयार केली जाते. व्हजाइनापासून लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया तयार करतात. लॅक्टोबेसिलस (lactobacillus) नावाचे हे बॅक्टीरिया शुगरला अॅसिडमध्ये कन्व्हर्ट करतात. या बॅक्टेरियाला मग पुन्हा बिअर तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये वापरले जाते.

 

स्त्री-रोग तज्ज्ञांची मदत
- कंपनीचे मालक वोजटेक मन यांनी धक्कादायक खुलासा करत सांगितले की, ही बिअर बनवण्यासाठी आम्ही एका स्त्रीरोग तज्ज्ञाची (gynaecologist) मदत घेत आहोत. ते मॉडल्सच्या बॉडी पार्टमधून बॅक्टेरिया घेतात आणि त्यावर काम करतात. या बिअरसोबतच गॅरंटीही दिली जाते की, या एक्स्पेरिमेंटमध्ये सहभागी मॉडेल्स पूर्णपणे स्वस्थ आहेत. या एक्स्पेरिमेंटमध्ये पोलंडच्या मॉडेल पॉलिना आणि मोनिका सहभागी झाल्या आहेत.


सर्वसाधारण बिअरसारखीच चव
- ही बिअर 28 जुलैला लाँच करण्यात आली आहे. हिचा सर्वात आधी आस्वाद घेणाऱ्या ग्रजेगॉर्ज मजुस्की या ग्राहकाने सांगितले की, 600 रुपये किमतीची ही बिअर चवीला सर्वसाधारण बिअरसारखीच आहे. यात काहीही अनोखे नाही. उत्सुकतेमुळे लोक जरूर ट्राय करतील, परंतु नेहमीच्या बिअरची जागा ही घेऊ शकणार नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या विचित्र बिअरचे आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...