आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावारसा - पोलंड आणि चेक रिपब्लिकच्या सीमवेर वसलेल्या मिजेस्के ओद्रजेनस्की हे गाव चर्चेचा विषय ठरले आहे. या गावात गेल्या 9 वर्षांपासून एकही मुलगा जन्माला आला नाही. येथे 2010 मध्ये शेवटच्यावेळी एका मुलगा जन्माला आला होता. मात्र त्याने देखील आपल्या कुटुंबासोबत गाव सोडले. आता येथे 12 वर्षांचा सर्वात लहान मुलगा आहे. या गावात मुलींचा जन्म होत असतो मात्र मुलाचा जन्म होणे बरीच दुर्मिळ बाब आहे. यामुळे येथील नगराध्यक्षाने ज्या घरात मुलगा जन्माला येईल त्यांना बक्षीण देण्याची घोषणा केली आहे.
गावात मुलींचा जन्म होण्यामागचे कारण कोणालाही माहित नाही. मात्र येथे अनेक दशकांपासून लिंगप्रमाणात हेच असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे. येथे मुलींच्या संख्या जास्त तर मुले नसल्यागत आहेत. तीनशे लोकसंख्या असलेल्या या गावात मुली आणि महिलांची संख्या जास्त आहे.
रेकॉर्ड पाहिल्यानंतर केली घोषणा
नगराध्यक्ष रेजमंड फ्रिशको यांनी नोंदणीकृत जन्मप्रमाणपत्र आणि ऐतिहासिक नोंदींची तपासणी केल्यानंतर या गावात मुलांचा जन्म न होणे ही अनोखी घटना असल्याची पुष्टी केली. नगराध्यक्षांनी बक्षीसाची घोषणा केल्यानंतर वारसाच्या एक विद्यापीठाने देखील येथील या अनोख्या घटनेबाबत संशोधन करणे सुरु केले आहे.
अग्निशमन जवान हेड टोमाज गोलाज सांगतात, माझ्या घरी मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. मात्र या गावातील इतिहास पाहता येथे मुलगा होण्याची शक्यता कमी आहे. पण याचा अर्थ असा नाही मी मुलींच्या विरोधात आहे. मला देखील दोन मुली आहेत आणि माझी पत्नी देखील याच गावातील रहिवासी आहे. पण कुटुंब पूर्ण करण्यासाठी मला मुलगा हवा आहे.
वारसाच्या वैद्यकीय विद्यापीठाचे प्राध्यापक रफाल प्लोस्की यांच्या मते, गावात जर मुले जन्माला येत नसतील ही चितेंचे बाब आहे. या गूढाचे निराकरण करणे सोपी गोष्ट नाही. यासाठी जुने रेकॉर्ड तपासावे लागतील. यासह मुलीच्या आई-वडिलांमधील संबंध तपासायला हवेत. ते दुरचे नातेवाईक तर नाही ना याची पुष्टी करावी लागले. याशिवाय पर्यावरणाची स्थिती पाहावी लागेल. तेव्हा हे गूढ सोडवता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.