आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण केंद्रात पोलिसांचा निशाणा चुकला, गोळीने केले युवकाला लक्ष्य 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- मैनापुरी(ता.जिंतूर) येथील पोलिस गोळीबार प्रशिक्षण केंद्रात गोळीबार करत असताना निशाणा चुकल्याने निसटलेल्या गोळीने नितीन विष्णू पुंड ( १६) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर शहरापासून दाेन किमी अंतरावर मैनापुरी या ठिकाणी पोलिस गोळीबार प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून पोलिस गोळीबार प्रात्यक्षिक करण्यासाठी येतात. शुक्रवारी (दि.११) जानेवारी रोजी प्रात्यक्षिक गोळीबार सुरू असताना दुपारी दाेनच्या सुमारास एक गोळी भिंतीच्या वरून सुटल्याने जालना रोडवरील नवोदय वसतिगृहात जेवण करत बसलेल्या नितीन पुंड या विद्यार्थ्यांच्या पायात घुसली. त्यास प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथून तत्काळ जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील सिग्मा या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे १२ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करून पायातील गोळी काढण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...