आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई; रोख, शस्त्रास्त्रे जप्त 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महानगरात मंगळवारी पोलिसांनी दाेन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकले. दाेन्ही छाप्यात जवळपास ५० अाराेपींवर कारवाई करण्यात अाली असून, दाेन्ही छाप्यात राेख रक्कम, शस्त्रांसह इतरही साहित्य जप्त करण्यात अाले. छाप्याच्या वेळी कायदा सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी राखीव पोलिस दलाचे जवानही तैनात करण्यात अाले हाेते. 

जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात माेठ्या प्रमाणात जुगार सुरु हाेता. या ठिकाणी जुगारींची जत्राच भरत असे. जुगारींकडे कारवाई हाेऊ नये, अड्ड्यावर पोलिसांना छापा पडण्याची कुणकुण लागावी, यासाठी अड्डा चालणाऱ्यांकडून विविध क्लृप्त्याही लढवल्या जात हाेता. अखेर मंगळवारी पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि परिविक्षाधीन भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी गौरव भामरे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या कारवाईत ४० आरोपी आणि साडे लाखांवर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

 
इराणी झोपडपट्टीत कारवाई :

सिटी काेतवाली पोलिसांनी इराणी झोपडपट्टी येथील वरली मटक्यावर कारवाई केली. ही कारवाई ठाणेदार विलास पाटील , हेकाॅ. प्रमोद पाटील, नागसेन वानखडे, ज्ञानेश्वर रडके, गोविंद चव्हाण, सतीश डोंगरे अादींनी केली. याप्रकरणी पोलिसांनी मो तैयाज अब्दुल शकुर (रा. जुने शहर) गजानन मांनवतकर ( रा ईराणी झोपडपट्टी) अजाबराव थोरात ( रा.गांधी चौक) हरिप्रसाद जोशी ( रा. रतनलाल प्लॉट), राजेश पाठक (रा.जुने शहर), विजय कुटाले (रा. मोठी उमरी), अमीर अहमद (खान रा.बै द पुरा), औलाद हुसेन (रा. ईराणी झोपडपट्टी ), प्रवीण ठाकरे (रा. शिवणी ) यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी अाराेपींकडून ४ मोबाइल फाेन, रोख ११,३०० रुपये असा एकूण १६,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला. 

 

बातम्या आणखी आहेत...