आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंजरवाड्यात 43 ड्रम दारू फेकली नाल्यात: अाठ महिलांवर कारवाई; मेगा वाॅश अाऊट माेहीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दररोज कारवाई केली जात आहे. रविवारी पोलिस उपअधीक्षक नीलभ रोहन यांनी कंजरवाडा परिसरात 'मेगा वॉश आऊट' मोहीम राबवली. यात ४३ ड्रम गावठी दारू नाल्यात फेकण्यात आली. तर १ लाख ८६ हजार ८०० रुपये किमतीची दारू व रसायन नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी आठ महिलांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रोहन यांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ७ वाजता पोलिसांचे पथक कंजरवाड्यातील अनिता सुधाकर बागडे यांच्या घराजवळ पोहाेचले. बागडे यांची २५ हजार २०० रुपये किमतीची ६ ड्रम गावठी हातभट्टीची दारू, शमाबाई अरुण माचरे यांच्या घराजवळून ३० हजार ८०० रुपये किमतीचे ७ ड्रम, नुरी महेश माचरे यांच्या घराजवळून ३५ हजार २०० रुपये किमतीची ८ ड्रम गावठी हातभट्टीची दारू तसेच चमनबाई पूजा कंजर याच्या घराबाहेर असलेल्या ३ ड्रममधून १३ हजार २०० रुपयांची उर्वरित.

 

शहरासह जिल्हाभरात कारवाईची माेहीम
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपअधीक्षक नीलभ रोहन, पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी ही माेहीम राबवली. तालुका पोलिस ठाणे अंतर्गत २ गुन्हे (१५ हजार ४६५ रुपयांची दारू व रसायन), शहर पोलिस ठाणे अंतर्गत १ गुन्हा (बाराशे रुपयांची दारू व रसायन), शनिपेठ पोलिस ठाणे अंतर्गत ३ गुन्हे (पाच हजार ७२३ रुपयांची दारू व रसायन), रामानंदनगर पोलिस ठाणे अंतर्गत १ गुन्हा (३२० रुपयांची दारू व रसायन), भुसावळ शहर पोलिस ठाणे अंतर्गत २ गुन्ह्यात (चार हजार ९० रुपयांची दारू व रसायन), फैजपूर पोलिस ठाणे अंतर्गत २ गुन्हे (२२ हजार २७६ रुपयांची दारू व रसायन), निंभोरा पोलिस ठाणे अंतर्गत २ गुन्हे (२ हजार ६५० रुपयांची दारू व रसायन) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

गावठी हातभट्टीची दारू मिळाली होती. तर दुसऱ्या पथकाने वंदना दशरथ कंजर यांच्या घराजवळून २५ हजार २०० रुपयांची ६ ड्रम, फुलाबाई गणपत भाट यांच्या घरापासून काही अंतरावरील ८ ड्रममधून ३५ हजार २०० रुपयांची दारू मिळाली होती. तसेच सुषमा रवी बांटुगे यांच्या घराजवळील ५ ड्रममधून २२ हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. ३ तास चाललेल्या कारवाईत पोलिसांनी ४३ ड्रममधून १ लाख ८६,८०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त करून नष्ट केली. संपूर्ण कंजरवाडा परिसरातील गटारी, नाल्यांमधून दारू व रसायन वाहत होते. हेमंत कळसकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रोहन यांच्यासह पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक विकास घनवट, उपनिरीक्षक योगेश शिंदे, राजकुमार ससाणे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दिनकर खैरनार, जितेंद्र राजपूत, दीपक चौधरी, मुदस्सर काझी, हेमंत कळसकर, आरसीपीच्या दोन पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, शहर पाेलिसांनी विविध घटनांमध्ये विलास शिरसाठ, संजय काेळी, राजू विसलकर व नीलेश तायडे यांच्याकडून ६ हजार ३०० रुपयांची दारु जप्त केली. 

बातम्या आणखी आहेत...