आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या बंगल्यातून अट्टल गुन्हेगारास अटक, 15 वर्षांपासून केअर टेकरचे करत होता काम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या गोराई येथील बंगल्यातून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपी या बंगल्यामध्ये केअर टेकर म्हणून काम करत होता. शक्ती सिद्धेश्वर राणा असे या गुन्हेगाराचे नाव आहे. राणा हा 29 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेतील आरोपी आहे. तो गेल्या 15 वर्षांपासून या बंगल्यात नोकर म्हणून राहात होता. त्याच्यावर चोरी आणि मारहाणीचा आरोप होता.  फिल्मी स्टाईल तपास करून पोलिसांनी त्याला अटक केली. 
 

जामीन मिळाल्यानंतर न्यायालयात हजर राहिला नाही
मुंबई येथील वरळी येथे 1990 मध्ये घडलेल्या एका घटनेत शक्ती राणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर एका घरात घुसून मारहाण करणे आणि सामान लुटून नेणे असे काही आरोप होते. यानंतर न्यायालयाने त्याला जामीन दिला. तेव्हापासून तो सुनावणीसाठी हजर राहिला नाही. पोलीस तेव्हापासून त्याच्या शोधात होते. 
 

खबऱ्यांद्वारे पोलिसांना मिळाली माहिती
पोलिसांनी या प्रकरणाचा शोध पुढे सुरू ठेवला. मात्र फरार झालेला शक्ती सापडलाच नाही. दरम्यान काही खबऱ्यांद्वारे पोलिसांना शक्तीविषयी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी हे जुने प्रकरण बाहेर काढले. 29 वर्षे जुने प्रकरण पुन्हा बाहेर आल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी गोराई येथे त्याचा शोध घेत असताना तो एक बंगल्यात सापडला. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर हा बंगला सलमान खानचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो या बंगल्यात आपली खरी ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता.