आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री पोलिस घाण बोलू लागले, अन् दारे, खिडक्या तोडून घरातून माणसांना ओढून नेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/पातूर- 'रात्री दहा साडेदहा वाजताच्या दरम्यान आम्हाला काहीच कल्पना नसताना पोलिस आमच्या घरासमोर आले आणि अतिशय घाण घाण बोलायला लागले आणि शिव्याही द्यायला लागले. नंतर त्यांनी जबरदस्ती केली. दारे खिडक्या मोडून ते घरात आले. घरात सगळे लहान मुले झोपलेले होते. ते अतिशय घाबरले. त्यांनी एकच आक्रोश केला. नंतर पोलिसांनी घरातील माणसांना जबरदस्तीने ओढून नेले. पायात चप्पल नाही, अंगात कपडे नाहीत. आज रात्रीपासून आमच्या पोटात अन्नाचा कण नाही, तुम्हीच सांगा कशी परिस्थिती निर्माण झाली असेल स्त्रियांवर, अशी आपबीती सांगत होत्या पातूर तालुक्यातील चरणगाव येथील महिला. शनिवारी रात्री ग्रामपंचायतच्या खुल्या जागेवर झेंडा लावण्यावरून दोन जाती समूह एरवी गुण्यागोविंदाने राहत असताना मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांच्यात प्रचंड दगडफेक झाली. यात काही नागरिकांसह उपस्थित असलेले चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर अकोल्याहून अतिरिक्त पोलिस कुमक गेली असता हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ७४ जणांना अटक केली. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. रविवारी चरणगावात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. 

 

शनिवारी रात्री दोन्ही गटांमध्ये प्रचंड दगडफेक सुरु असून तणाव सदृष्य परिस्थितीची माहिती उपस्थित असलेल्या व दगडफेकीत जखमी झालेल्या चान्नी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ते दाखल झाले. मात्र पोलिसांचे संख्याबळ कमी पडल्याने व दंगल हाताबाहेर जात असल्याचे कळताच अकोल्याहून पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे अतिरिक्त .

कुमक घेऊन चरणगावात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरु केली. या वेळी आरसीपीच्या जवानांनी धरपकड करताना अतिरेक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी बंद दारे-खिडक्या तोडून घरात प्रवेश केला. यामध्ये घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिरेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी गावात असलेल्या महिलांनी केली आहे. पोलिस कारवाईच्या धास्तीने गावात शुकशुकाट असून, अनेक जण भूमिगत झाले आहेत. तर दंगल घडवणाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास चान्नीचे ठाणेदार प्रकाश झोडगे करीत असून, पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 


आमच्या गावात रविवारी ६ जानेवारी रोजी तेरवीचा कार्यक्रम असल्यामुळे माझे वडील तेथे अगोदरच्या दिवशी संध्याकाळी जेवण करायला व तेरवीचा स्वयंपाक करताना पोलिसांनी मारझोड करत माझ्या बाबांना पोलिस गाडीत घेऊन गेले. -राणी गजानन देशमुख 

 

आम्ही चरणगाव येथे माझ्या सासऱ्याची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो होतो. मात्र पोलिसांनी विचारपूस न करता माझ्या पतीचा मोडलेल्या पायावर मारहाण केली व पुन्हा पाय मोडला. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकारी दखल घेतली काय. जिजाबाई देशमुख 

 

क्रॉसचेक करूनच आरोपी केले, अतिरेक कुणावरही केला नाही 

परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. एक महिन्याअगोदर शेजारील मंदिराचे बांधकाम झालेले होते. त्याच्याजवळ असलेल्या खुल्या जागेवर एका समुहाने झेंडा लावला होता. त्यानंतर त्या समुहाचे लोकांनी तेथे प्रार्थना केली. ते सगळे झाल्यानंतर ते लोक घरी परत जात असताना त्यानंतर दुसऱ्या समुहाचे लोक तेथे आले. त्यांनी आधी लावलेला झेंडा काढून त्याच्याबाजूला दुसरा झेंडा लावत होते. हे माहिती पडताच ते लोक परत आले. तेथे पीएसआय जयसिंग पाटील आणि इतर पोलिस होते. दोन्ही गटाची दगडफेक असताना चार पोलिस काही करू शकत नव्हते. मला फोन आल्यानंतर मी तेथे गेलो. तुफान दगडफेकीत अनेक लोकांची डोके फुटले आहेत. त्यानंतर कुणी दगडफेक केली हे पोलिसांना माहित होते. त्यानुसार पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना पकडले. हे सर्व पोलिसांच्या समोरच घडल्याने कुणावरही अतिरेकी कारवाईचा प्रश्नच नाही. क्रॉसचेक केल्यानंतरच आपण आरोपींना ताब्यात घेतले. मी स्वत: उपस्थित होतो. कुणावरही अतिरेक झाला नाही. नियमानुसार कारवाई केली. एम. राकेश कलासागर, पोलिस अधीक्षक 

 

या आरोपींना केली अटक 
नीलेश इंगळे, दीपक इंगळे, राहुल इंगळे सचिन इंगळे, प्रदीप खंडारे, अविनाश इंगळे, नितीन इंगळे, मुरलीधर इंगळे, प्रभाकर इंगळे, अशोक इंगळे, चंद्रमणी पुंडलिक इंगळे, शिवदास तेलगोटे, अजित इंगळे, रवींद्र इंगळे, बबन इंगळे, किरण इंगळे, श्रीकृष्ण इंगळे, नीलेश विश्वनाथ इंगळे, दिनकर इंगळे, रामकृष्ण संपत इंगळे, प्रशांत इंगळे, देविदास संपत उपवर, प्रवीण इंगळे, मंगेशकर प्रीतम इंगळे, भीमराव अमोल सोनवणे, सचिन दाभाडे, अंकुश पगारे, उमेश पंडितराव देशमुख, गजानन सुंदरराव देशमुख, गजानन चंद्रभान देशमुख, तुळशीदास सदाराम बनकर,मोहन निलकंठराव देशमुख, सागर प्रकाशराव ताले, श्याम राजेश गावंडे, भास्कर रामकृष्ण वसतकार, गोपाल गजानन देशमुख , योगेश देशमुख, वैभव रमेशराव देशमुख, दीपक मनोहर बनवरे, तुळशीराम श्रीराम वसतकार, बाबुलाल बळीराम काळे, सुशांत अनिल देशमुख, गजानन गोविंदराव वसतकार, मनोज मधुकर टणकर, मदन शामराव सरकटे, संजय गजानन सुलताने , कैलास एकनाथ सुलताने, नीलेश रामकृष्ण देशमुख, श्रीकांत शंकर पाचपोर, सागर अशोक सुलताने, दिलीप दयाराम सुल्ताने, श्रीकांत मधुकर गाडेकर, मधुकर देशमुख, गोपाल गोविंदराव वसतकार, रामकृष्ण नारायण वसतकार, कैलाश महादेव देशमुख, विष्णू काशीराम राखोंडे, मंगेश भगवान वाघ, रतीराम सुल्ताने, अमोल पुरुषोत्तम शेळके, दिनकर रामकृष्ण वसतकार, महादेव सूर्यभान, आशिष विलासराव देशमुख, ज्ञानेश्वर गाडेकर व अधिक २५ पुढील तपास जयसिंग पाटील करीत आहेत.