आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस वाहन आडवे करुन कंटेनर पकडला ; ७० जनावरांना जीवनदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पोलिसांनी साेमवारी ७० गुरांची (गाैवंश) निर्दयतेने वाहतूक करणारा कंटेनर पकडला. पोलिसांना पाहून चालकाने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्वत:चे वाहन कंटेनरसमाेर अाडवे करुन कंटेनर पकडला. याप्रकरणी पाेलिसांनी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एका कंटेनरमधून गोवंशाची वाहतूक होत अाहे, अशी माहिती विशेष पथकाला मिळाली. एपीअाय हर्षराज अळसपुरेंच्या पथकाने एमअायडीसीत सापळा रचला. नागपूरकडून येणाऱ्या या कंटेनरवर पोलिसांनी मूर्तिजापूर राेडवरुन वाॅच ठेवला. युपी २१ बीएन ८३१० या क्रं चा कंटेनर हत्ती पुतळ्याजवळून एमअायडीसीत जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी कंटेनर राेखण्याचा इशारा केला. मात्र चालकाने कंटेनर चालवणे सुरुच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करीत कंटेनर पकडला. त्यानंतर कंटेनरची पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पाहणी केली. भाेपाळवरुन अालेला कंटेनर अाैरंगाबादकडे निघाला हाेता, अशी माहिती सूत्रांनी िदली. याप्रकरणी पोलिसांनी फिरोज आलम रियासत (वय ३२, रा. मो. इब्राहिमपूर, मुरादाबाद, उ. प्र. ), जावेद शाह शब्बीर शाह (वय २२, रा पीपलोंन, आगर, मालवा, म. प्र. ), संतोष घासीराम ठाकुर (वय २८, रा. काचीखेडी, राजगढ़, म. प्र. ) आणि जलील शाह सलीम शाह (वय २१, रा. नजरपूर, उज्जैन, म. प्र. ) चाैघांना ताब्यात घेतले अाहे. 


कंटेनरमध्ये जनावरांसाठी पार्टीशन : या कंटेनरममध्ये जनावरांसाठी पार्टिशन केले हाेते. कंटेनर उंच असल्याने अातील जागा दाेन भागात विभाजित केल्याने जादा गुरांची वाहतूक हाेत असे. अात हवा, प्रकाश जावा, यासाठी कंटेनरच्या छताला माेठे छिद्रेही पाडलेली हाेती. 
पाेिलसांनी साेमवारी ७० गुरांची निर्दयतेने वाहतूक करणारा कंटेनर पकडला. पाेिलसांना पाहून चालकाने पलायनाचा प्रयत्न केला. पाेेिलसांनी वाहन अाडवे करुन कंटेनर पकडला. कंटेनरमध्ये जनावरांसाठी पार्टीशन हाेते. 
 

बातम्या आणखी आहेत...