Home | National | Madhya Pradesh | Police arrested Boy And Girl From Airport Trying To Filmy style Escape

कंपाउंडरसोबत पळून जात होती डॉक्टरची मुलगी, बुक केले फ्लाइटचे तिकीट, अकाउंटमधून पैसे गेल्याचा मेसेज येताच वडिलांना बसला धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 27, 2018, 11:10 AM IST

एका डॉक्टरच्या 16 वर्षीय मुलीला त्यांच्याच येथे काम करणारा कंपाउंडरला प्रेमजालात अडकवून पळवून नेत होता.

 • Police arrested Boy And Girl From Airport Trying To Filmy style Escape

  इंदूर - एका डॉक्टरच्या 16 वर्षीय मुलीला त्यांच्याच येथे काम करणारा कंपाउंडरला प्रेमजालात अडकवून पळवून नेत होता. अल्पवयीन मुलीनेही आईवडिलांना सोडून नोकरासोबत कोलकात्याच्या फ्लाइटचे तिकीट बुक केले आणि एअरपोर्टवर दोघेही चेकइन करून बसले. तिकिटाची अमाउंट वडिलांच्या अकाउंटमधून कटली आणि त्यांना जेव्हा मेसेज आला तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती कळवली की, त्यांच्या मुलीचे अपहरण झाले आहे.


  क्लासची फीस जमा करायचे सांगून घरातून निघाली होती मुलगी
  सिमरोल आणि एरोड्रम पोलिसांनी दोघांनाही एअरपोर्टवर पकडले. पोलिसांनी नोकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. एरोड्रम टीआय अशोक पाटीदार म्हणाले की, घटना शनिवारची आहे. डॉक्टरांची मुलगी आईला भंवरकुआमधील एका क्लासची फीस जमा करायचे सांगून घरातून निघाली होती. काही वेळानंतर आईने क्लासमध्ये फोन केला तेव्हा कळले की, मुलगी तेथे आलेलीच नाही. यावर आईने मुलीला अनेक कॉल केले, परंतु तिने उचलले नाही. काही वेळानंतर वडिलांच्या मोबाइलवर अकाउंटमधून 18 हजार रुपये कटल्याचा मेसेज आला. तेव्हा त्यांना कळले की, कुणीतरी त्यांचे खाते वापरून कोलकात्यासाठी दोन तिकीट काढले आहेत. यावर त्यांनी पत्नीला संपर्क केला, तेव्हा कळले की मुलगी गायब आहे, फोन उचलत नाही. डॉक्टरांनी तत्काळ पोलिस कंट्रोल रूमला अपहरण झाल्याची माहिती दिली. यावर पोलिस पथक एअरपोर्ट परिसरात पोहोचले आणि सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना लेखी सूचना देऊन कोलकाता फ्लाइटच्या पॅसेंजरना चेक करण्याचे निवेदन दिले. तेव्हा कळले की मुलीने डॉक्टरकडे काम करणाऱ्या कंपाउंडर मनिमय बिश्वाससोबत कोलकात्याला जाणाऱ्या फ्लाइटसाठी चेक-इन केलेले आहे. यावर पोलिसांनी इंडिगो फ्लाइटच्या मॅनेजरला लेखी माहिती दिली आणि सीआयएसएफच्या मदतीने मुलगी आणि आरोपी मनिमय विश्वास यांना पकडले.


  आधार कार्डमध्ये वय 18 वर्षे एक महिना, 10वीच्या मार्कशीटमध्ये 16 वर्षे 1 महिना
  एरोड्रम टीआय अशोक पाटीदार म्हणाले की, मुलीने ज्या आधार कार्डमधून चेक इन केले होते, त्यात तिचे वय 18 वर्षे 1 महिना होते. वडिलांकडून जेव्हा 10वी आणि 8वीची मार्कशीट मागवली तेव्हा त्यात 16 वर्षे 1 महिना आढळले. मुलीला जेव्हा पोलिस परत नेऊ लागले तेव्हा तिने एअरपोर्ट परिसरआत मोठा गोंधळ घातला. ती ओरडून-ओरडून बोलू लागली होती की, मला माझे आईवडील आवडत नाहीत, मी त्यांच्याकडे जाणार नाही.


  नोकरीवरून काढून टाकले होते कंपाउंडरला
  इकडे आरोपी मनिमय बिश्वासबाबत पोलिसांनी सांगितले की, तो डॉक्टरांकडे कंपाउंडर होता. यादरम्यान त्याचे घरातही येणे-जाणे होते. काही दिवसांपूर्वी त्याच्या वागणुकीमुळे डॉक्टर दांपत्याने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. सूत्रांनुसार, नोकरीवर असतानाच त्याने डॉक्टरच्या मुलीला प्रेमजालात अडकवले होते. दुसरीकडे, तो मुलीला भंवरकुआमधील क्लास सोडण्यासाठी आणि आणण्यासाठीही जात होता. त्याच्या बोलण्याला भुलून मुलगी घरातून आईला खोटे सांगून पळाली होती. एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दोन्ही पोलिस स्टेशनला 5-5 हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

Trending