आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टाफसोबत लाल दिव्याच्या गाडीत फिरायची महिला, स्वत:ला सांगायची डिप्टी कलेक्टर, दिखावा एवढा की लोकांना वाटायची खरी खुरी कलेक्टर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- तुम्ही "स्पेशल 26" सिनेमा पाहिला असेल, त्यात खोटे आधिकारी बनून यायचे आणि लोकांना लुटायचे. तशाच प्रकारची घटना गुजरातच्या सूरतमध्ये घडली आहे. पोलिसांनी 7 महिन्यांपासून फरारा असलेल्या महिला चोराला पकडले आहे. ही महिला स्वत:ला डिप्टी कलेक्टर सांगायची आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायची. तिने खोट्या सरकारी कार्डावर एक घर किरायावर घेतले होते. त्यानंतर घर मालकाना झींगा मत्स्य पालनाचा व्ययसाय करण्यात भागीदारी देते असे सांगून त्याच्याकडून 32.20 लाख रूपये लुटले. घराचा 4.32 लाखांचा किरायपण दिला नाही आणि पळून गेली. पोलिसांनी सोमवारी आरोपी महिला नेहा बिपिन पटेलला बारडोलीमधून अटक करून न्यायालयात हजर केले, तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


जे आयडी कार्ड दाखवले त्यावर वडोदराची डिप्टी कलेक्टर लिहीले होते, दिखावा पाहून कोणालाच येन नव्हता संशय...

 

''नेहा बिपिन पटेल नावाची महिला 2010 मध्ये घर किरायावर घ्यायला आली होती. पण तिने घर 2011 मध्ये घेतले. तिने सांगितले की, मुलीच्या शिक्षणासाठी तिला येते राहायचे आहे. तिने सांगितले की, ती डिप्टी कलेक्टर आहे आणि नवसारी, राजपिपला आणि बड़ौदामध्ये काम केलेले आहे. रेंट अॅग्रीमेंटसाठी तिने आयडी कार्डची कॉपी दिली, तिने त्यावर तिचे पद वडोदरा शहरी विकास मंडळची डिप्टी कलेक्टर लिहीले होते. हे सगळे पाहून तिला कृष्णा रो हाउस बंगला-1 तिला किरायावर दिला. ती लाल दिव्याच्या गाडीत फिरायची आणि तिच्याकडे एक ड्रायव्हर आणि दोन तीने नोकर कामाला होते, त्यामुळे तिच्यावर कधी संशय येत नव्हता. तिने मला झींगा मत्स्य पालनासाठी 50 लाख रूपये मागितले होते पण मी तिला 32.20 लाख रूपये दिले. त्यानंर ती फरार झाली आणि माझ्या घराचा 4 वर्षांचा किराया 4.32 लाख रूपये पण दिला नाही. घर मालक संजय मोरकत यांनी तिच्या विरूद्ध पोलसांत 36.60 लाख रूपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...