आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरत - डान्स प्रोग्राममध्ये बोलवून लोकांना लुटणारी गुजराती अल्बमची एक अॅक्ट्रेस आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. अॅक्ट्रेसने 'वन्स मोअर बेवफा' आणि 'जानू मारी दगाबाज' यासारख्या गुजराती अल्बममध्ये काम केलेले आहे. पोलिसांत कुणी तक्रार करू नये म्हणून न्यूड व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकीही द्यायची. रामोल पोलिस चौकीत तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, गुजराती अल्बममध्ये अभिनय करणाऱ्या संजना ऊर्फ संजू दुर्गेशभाई परमार ही तिचा साथीदार मोईन अली सय्यदसोबत मिळून लूटमार करायची. संजना डान्स प्रोग्राममध्ये येणाऱ्याशी आधी मैत्री करायची आणि त्यांना निमंत्रित करायची. डान्स पाहायला येणाऱ्यांना मग संजना आणि तिचे साथीदार मिळून लुटायची.
संजनाविरुद्ध 3 गुन्हे दाखल
1. रामोल पोलिसांत तक्रार दाखल करणारे प्रताप गोहिल म्हणाले की, संजनाने डान्स प्रोग्राममध्ये बोलावल्यानंतर आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यांना सुनसान जागेवर नेले. मारहाण करून 6 तोळे सोन्याची चेन हिसकावली. साथीदारांच्या मदतीने तिने न्यूड व्हिडिओही बनवला.
2. सहजाद खान पठाणला डान्सच्या बहाण्याने बोलावून संजना आणि तिच्या साथीदारांनी मारहाण केली व 4500 रुपये नकदी आणि मोबाइल हिसकावून घेतला. शहजाद खान म्हणाले की, संजना लोकांना डान्सच्या बहाण्याने बोलवायची आणि त्यांना मारहाण करून लूटमार करायची.
3. वस्त्राल येथील शैलेष पटेल यांना संजना आणि तिच्या साथीदारांनी लुटल्यानंतर न्यूड व्हिडिओही बनवला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी संजना, मोईन अली आणि मोईनच्या चुलत भावाला अटक केली. पोलिसांनी संजनाच्या घरातून 2 लाख 54 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
चैनीसाठी करायचे असे काम
संजनाची पती बेरोजगार आहे. यामुळे शौक पूर्ण करण्यासाठी तिने साथीदारांच्या मदतीने लूटमार सुरू केली. आपल्या बेरोजगार पतीला सोडून ती रामोलमध्ये राहू लागली होती. यादरम्यान तिची भेट मोईन अलीशी झाली. संजना अनेक महिन्यांपासून मोईनसोबत एकाच घरात राहिली. ऑक्टोबरमध्ये दोघांमध्ये वाद झाला. संजनाने रामोल पोलिसांत मोईन खानविरुद्ध अपहरण आणि लुटमारीची तक्रार दाखल केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.