आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP नेत्याची हत्या करून पोलिस ठाण्यात पोहचला आरोपी; ओरडून आपला गुन्हा कबुल केला, पण नंतर घटनेत आला ट्विस्ट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदसौर(मध्यप्रदेश)- गुंड मनीष बैरागीच्या अटकेबद्दल अजून एक माहिती समोर आली आहे. त्याने नगराध्यक्ष प्रहलाद बंधवार ला दिलेले पैसे परत न मिळाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाय ठेवण्याची प्लॅनिंग केली. त्यानंतर प्रतापगढ जेलमध्ये राहून तेथून श्रीमंत लोकांना फोन करून मोठी रक्कम वसुल करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर नगराध्यक्षाला गोळी मारून प्रतापगढला गेला आणि जोराने ओरडून खून केल्याचे पोलिसांसमोर कबुल केले.


वायडीनगर टीआय विनोदसिंह कुशवाह यांनी सांगितले की, मनीषने नगराध्यक्षाचा खून गुन्हागारी जगतात पाउल ठेवण्यासाठी केली आहे. त्याने चौकशीत सांगितले की, 17 जानेवारीच्या संध्याकाळी 6.30 वाजता लोकेंद्र कुमावतच्या दुकानासमोर पोहचला. तेथे बंधवारची वाट पाहिली आणि तसे तो आला त्याने त्याच्या पोटात एक आणि डोक्यात एक गोळी मारली. त्यानंतर गाडी सुरू करून पळून जात होता पण गाडी सुरू झाली नाही त्यामुळे गाडी तिथेच टाकून पळून गेला. सुचित्रा टॉकीजची भिंत ओलांडून पळताना त्याच्या पोटाला मार लागला. नंतर बंडी चौकत पोहचला, तेथे पोलिसांची मुमेंट पाहून अंधारातून अंकुर अपार्टमेंटमध्ये गेला आणि ऑफीसमध्ये बंदुक लपवली. बाहेर येताच ऑटो पकडून लाभमुनि नेत्रालयात गेला आणि नंतर उद्यानिकी कॉलेजजवळ लपून बसला.


दुरून बस येताना पाहिली आणि तिला थांबवून सूरजनीला पोहचला. तिते पाहचल्यावर त्याने तुरूंगातील साथी भय्यू वसीमबद्दल लोकांना विचारले. येथील एका व्यक्तीने भय्यूसोबत त्याची फोनवरून बोलणे करून दिले पण भय्यूने त्याला ओळखण्यास नकार दिला. नतंर तो शेवटच्या बसने शामगढला गेला. तेथून ट्रेनने कोटाला गेला, तेथून उदयपूर आणि प्रतापगंढला गेला. तेथे सरकारी रूग्णालयात जाऊन ओरडला आणि पोलिसांना सगळं सांगितले. त्यानंतर त्याला न्यायालयात नेण्यात आले, आणि तेथून त्याला 23 तारखेपर्यंक रिमांडवर पाठवले आहे.


व्यवहार दाखवण्यासाठी पोलिसांनी सादर केले साक्षीदार 
गुंडं मनीष आणि नगराध्यक्ष बंधवार यांच्यात संबंध आणि पैशांचे व्यवहार असल्याचे समोर आणण्यासाठी पोलिसांनी मिडियासमोर साक्षीदारही सादर केले. यांत गोलू शाहने पैशांचे व्यवहार असल्याचे सांगितले. 


 

बातम्या आणखी आहेत...