आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी देओल यांच्या रोड शो दरम्यान 6 खिशे कापू महिलांना पोलिसांनी पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठानकोट- अभिनेत्यावरून खासदार बनलेले सनी देओलच्या रोड शो दरम्यान लोकांचे खिशे कापणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. स्टेशन डिव्हीजन नं.2 पोलिसांनी या टोळीला रेल्वे स्टेशनवरून पकडले. आरोपी महिला अरशना, अर्पिता, सरिता, प्रिया, सीरत आणि चंदा बिलासपुर, जिल्हा रांची, झारझंडच्या रहिवासी आहेत.


या आरोपी महिला होशियारपूरच्या रेल्वे स्टेशनकडे येत होत्या. पोलिसांनी पकडेलल्या महिलांकडून 38 हजार 500 रूपये जप्त करण्यात आले आहेत. या महिलांनी सनी देओलच्या रॅलीदरम्यान 2 लोकांचे खिशे कापले. 


काँग्रेस नेते बंटी यांच्याकडून 91 हजार चोरले 
20 एप्रिलला ढांगू रोड अॅक्टिवा एजंसी जवळ जेवण करण्यासाठी गेलेले काँग्रेसच्या नेते आणि कंत्राटदार विकास महाजन उर्फ बंटी यांचा खिसा कापून महिलांनी 91 हजार चोरले.