Home | Maharashtra | Mumbai | Police arrested the underworld don Dawood Ibrahim's nephew Rijwan Kaskar

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला मुंबई विमानतळावरून अटक, खंडणी प्रकरणात पोलिस घेत होते शोध

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 18, 2019, 03:58 PM IST

देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता रिजवान कासकर

  • Police arrested the underworld don Dawood Ibrahim's nephew Rijwan Kaskar

    मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकरला मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री विमानतळावरून अटक केली. खंडणीच्या प्रकरणात पोलिस अनेक दिवसांपासून त्याचा शोध शोध घेत होते. दरम्यान रिजवान देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. रिजवान दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकर याचा मुलगा आहे.


    यापूर्वी मुंबई पोलिसांनी 16 जुलै रोजी दाऊद आणि छोझा शकील विरोधात तपास करत असताना अफरोज वडारिया ऊर्फ अहमद रजाला अटक केली होती. अहमद दाऊदच्या टोळीतील सदस्य फहिम मचमचचा जवळचा व्यक्ती आहे. सु्त्रांनी सांगितले की, पोलिसांनी वडारियाविरोधात लुक आउट नोटीस जारी केली होती. या नोटीसच्या आधारावर वडारियाला अटक करण्यात आली.

    पोलिस सुत्रांनी सांगितले की, वडारियाच्या चौकशी दरम्यान खंडणीच्या प्रकरणात रिजवानचे नाव समोर आले होते. यानंतर पोलिसांनी रिजवानला पकडण्यासाठी सापळा रचला होता.

Trending