आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीट मारून सोयाबीनचे पोते लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कंपनीच्या ट्रकमधून सोयाबीनचे पोते चोरताना दिसल्यामुळे एका व्यक्तीने चोरट्यांना हटकले. यावेळी तिघापैकी एकाने हटकणाऱ्या व्यक्तीला वीट मारून जखमी केले व सोयाबिीनचे पोते लंपास केले. या प्रकरणी तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी रविवारी (दि. ११) गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

 

दाद्या ऊर्फ अविनाश विनोद रणधीर (२१), स्वप्नील लक्ष्मण भेंडारकर (२५) आणि शैलेश नामदेव गणवीर (२३, तिघेही रा. मिलचाळ, नवीवस्ती बडनेरा) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजेश भगवानदास गुनदैय्या (३१, रा. बडनेरा) यांनी पोलिसात तक्रार केली होती. रणधीर, स्वप्नील व शैलेश या तिघांनी रविवारी (दि. ११) दुपारी दोन वाजताच्या सुमारास नवीवस्ती बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका सोयाबीनच्या ट्रकमधून सोयाबीन काढून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुनदैय्या यांच्या मित्रांना हे तिघे दिसले. त्यामुळे त्यांनी या तिघांना हटकले असता यापैकी स्वप्निलने त्यांच्या कानाजवळ वीट मारून त्यांना जखमी केले.

 

त्यानंतर या तिघांनी सोयाबीनचे एक पोते लंपास केले. या प्रकरणाची माहिती जखमीने गुनदैय्या यांना दिली. या प्रकरणी गुनदैय्या यांनी बडनेरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रविवारी तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 
आरोपींना पोलिस कोठडी.

बातम्या आणखी आहेत...