आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात आलेल्या विदेशी पर्यटकांचे सामान चोरी करत होते बाप-लेक, सीसीटीव्हीत समोर आले दोघांचे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया- बिहारमधील महाबोधी मंदिरातुन भाविकांच्या बॅगा चोरी करणाऱ्या जोडीला पोलिसांनी अटक केली आहे. दोघे बाप-लेक असुन ते मंदिरात येणाऱ्या विदेशी भाविकांच्या बॅगा चोरी करत होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, तेनजिंग कलसंग(बाप) आणि दोरबु कलसंग (मुलगा) हे काठमांडुचे रहिवासी असुन त्यांनी आतापर्यंत अनेक भाविकांच्या बॅगा चोरल्या होत्या. त्यांच्याकडुन अनेक देशांचे चलन, चार मोबाईल आणि तीन भारतीय सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. त्यांनी चोरलेल्या काही बॅगांमध्ये विदेशी पर्यटकांचे कागदपत्र आहे. 


पर्यटकांच्या तक्रारारीनंतर पोलिसांनी केली कारवाई
> या बाप-लेकांच्या निशाण्यावर विदेशी पर्यटक होते. ही जोडी पर्यटकांच्या बॅगा चोरुन फरार होत असे. 14 तारखेला पोलंडच्या एका महिलेने तिची बॅग चोरी गेल्याची पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी एका चीनी महिलेनेही तिची बॅग चोरी गेल्याची तक्रार केली. तेव्हा विदेशी पर्यटकांच्या बॅगा चोरी करणारी एखादी टोळी अस्तित्वात असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा या चोरांचे कृत्य समोर आले. ही जोडी मंदिरात दर्शनासाठी येऊन भाविकांच्या बॅगा चोरी करत होती. दोघेजण सकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान चोरी करत होते. पोलिस दोघांची कसून चौकशी करत त्यांनी चोरलेल्या बॅगांचा शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...