Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | police ASI suicide in amravati

मुलाला देण्यास पैसे नसल्याने एएसआयची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Mar 12, 2019, 02:02 PM IST

पोलिस उपनिरीक्षकाने (एएसआय) गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिस आयुक्त  व उपायुक्तां

 • police ASI suicide in amravati

  अमरावती - दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने पुण्यात शिकत असलेल्या मुलाला पैसे पाठवू शकत नसल्याच्या विवंचनेतून अमरावतीमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षकाने (एएसआय) गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिस आयुक्त व उपायुक्तांची नावे लिहून ठेवली आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.


  रामसिंग गुलाबसिंग चौहान (५६) असे आत्महत्या करणाऱ्या एएसआयचे नाव असून ते कोतवाली ठाण्यात कार्यरत होते. ३२ वर्षांपासून ते पोलिस सेवेत कार्यरत होते. साप्ताहिक सुटी असल्याने रामसिंग त्यांच्या चपराशीपुरा येथील घरीच होते. महापालिकेत कर्तव्यावर असलेल्या पत्नीला घेण्याकरिता ते रोज दुपारी जात. आज आले नसल्याने पत्नीने पुतण्यास फोन करून विचारणा केली. घराच्या बाजूला राहणाऱ्या पुतण्याने काचांतून पाहिले असता रामसिंग यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.


  पगार न होणे ही प्रशासकीय बाब : चौहान १४०० दिवस कर्तव्यावर अनुपस्थित होते. २८ नोव्हेंबर २०१८ ते १४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ७९ दिवस आजाराचे कारणास्तव कर्तव्यावर अनुपस्थित असताना वैद्यकीय कागदपत्रे सादर केली नाही. मानवीय दृष्टिकोनातून कर्तव्यावर घेतले. १४ फेब्रुवारीला कर्तव्यावर हजर झाल्याने त्यांचे वेतन सुरू करण्यात आले होते. वेतन न होणे केवळ प्रशासकीय बाब असल्याचे पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


  आयुक्तांनी वेतन काढू दिले नसल्याचा चिठ्ठीत आरोप
  ‘२८ नोव्हेंबर २०१८ ते १४ फेब्रुवारी २०१९ दरम्यान ७९ दिवस आजाराच्या कारणाने कर्तव्यावर अनुपस्थित होते. आजारी रजेवर असताना या कालावधीचे वेतन काढण्यात अाले नाही. कर्तव्यावर असतानाही वेतन काढण्यात आले नाही. संबंधित कर्मचाऱ्यास विचारणा केली असता पोलिस आयुक्त, उपायुक्त यांनी मनाई केल्याचे सांगितले. दरम्यान, आपला अपघात झाला तरीसुद्धा आयुक्तांनी वेतन न काढल्याने कर्ज झाले. माेठा मुलगा पुण्यात शिक्षण घेत असून त्याला पाठवण्याकरिता पैसे नसून त्रस्त झाल्याने आत्महत्या करत आहे’, असे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

Trending