आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाने महिलेला शिवीगाळ करत पट्ट्याने केली मारहाणी, फरीदाबादमध्ये घडली लाजिरवाणी घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद(हरियाणा)- फरीदाबादमध्ये पोलिसांनी एका महिलेल्या शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत एक पोलिस कर्मचारी महिलेला तिचा मोबाईल क्रमांक विचारत आहे, तर अन्य पोलिस कर्मचारी तिला पट्ट्याने मारहाण करताना दिसतोय.


संबंधित व्हिडीओ हरियाणातील फरीदाबाद पोलिसांचा आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर हरियाणा पोलिसांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. या प्रकरणी 5 पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आयुक्तांनी यातील 2 हेड कॉन्स्टेबल आणि 3 पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.


महिलेला पुरुष पोलिस कर्मचारी ताब्यात कसे घेऊ शकतात?
मारहाणीचा हा 4 मिनिटे 24 सेकंदाचा व्हिडीओ हरियाणातील वल्लभगडच्या आदर्श नगर पोलिस स्टेशनमधला आहे. या प्रकरणानंतर महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच हा प्रकार लाजिरवणा असल्याचे म्हणत कारवाईची मागणी केली आहे. एका महिलेला पुरुष पोलिस कर्मचारी पार्कमधून कसे घेऊन जाऊ शकतात याची आयोगाने केली आहे. महिलेला कोणत्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले होते आणि मारहाण का झाली, असेही प्रश्न आयोगाने उपस्थित केले.

 

पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी प्रकरण समोर येताच तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस ठाणे प्रमुखांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ऑक्टोबर 2018 मधील असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पीडित महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. महिला आयोग महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.