आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Police Break The Law To Get Justice But It Won't Be Wrong' Director Rohit Shetty

'न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कायदा मोडला तरी ते चूक ठरणार नाही' - दिग्दर्शक रोहित शेट्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'सिम्बा' अाणि 'सिंघम' चित्रपटानंतर रोहित शेट्टी 'सूर्यवंशी'मध्येदेखील पोलिस अधिकाऱ्याची कथा दाखवणार आहे. हा चित्रपट ३१ जानेवारी रेाजी रिलीज होणार आहे. लोकांना न्याय देण्यासाठी पोलिसांनी कायदा मोडला तरी त्यात काही चुकीचे नाही, असे रोहितला वाटते. या मुलाखतीत त्याने या चित्रपटावर चर्चा केली...

'बॅड बॉइज' चित्रपटाशी कसा जोडला गेलास? यापूर्वीदेखील आॅफर आल्या होत्या का ?

हो, ऑफर्स तर खूप आल्या होत्या. या चित्रपटात मी काम करू शकतो, असा विश्वास वाटला. मी ज्या प्रकारचे चित्रपट बनवतो, त्याच प्रकारचा हा चित्रपट आहे, असे मला वाटते. हा एक योग्य फ्रँचायजी आहे. मी त्याला न्याय देऊ शकतो, असे मला वाटले. त्यामुळे मला जेव्हा याची आॅफर आली तेव्हा मी याला नकार देऊ शकलो नाही.

'बॅड बॉइज'मध्ये देखील कायदा तोडून लोकांचे संरक्षण केले जाते. येथील पोलिसांवर आधारित चित्रपटात हेच दाखवण्यात येते. अशी संकल्पना लोकांना का आवडते ?

आपल्याकडे 'सिम्बा' चालला, याचा अर्थ लाेकांना अशा प्रकारचे चित्रपट आवडतात, असे यावरून कळते. शेवटी न्याय मिळाला पाहिजे, असे मला वाटते. ते कसे हेाते ते महत्त्वाचे आहे.

रोहित शेट्टींकडे स्टोरी आयडिया कशी आणि कुठून येते ?

खरं तर, आपल्या देशात आणि समाजात ज्या गोष्टी घडतात, त्याावरुनच मला या आयडिया सूचतात. त्याला प्रासंगिक बनवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हे सर्व मी प्रेक्षकांना नजरेसमोर ठेऊनच करत असतो. माझ्या चित्रपटांना पाहायला जे लोक येतात, त्यांचा मी आधी विचार करताे. माझ्या चित्रपटाचा एक वर्ग वेगळा आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटावर प्रामाणिकपणे काम करण्याची माझी जबाबदारी आहे. लोक मोठ्या अपेक्षेने माझे चित्रपट पाहायला येतात, त्यामुळे जे करायचे आहे, ते चंागल्यात चांगले करण्याचा माझा प्रयत्न असतो.

नवीन वर्षात कोणता संकल्प केला ?

मी या सर्व गोष्टी मानत नाही. काही लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिममध्ये दिसतात, मात्र काही काळानंतर ते गायब होतात. काही लोक १ जानेवारीला दारू सोडतात मात्र ८ ते १० जानेवारीला पाहिलं तर ते पुन्हा पिताना दिसतात. त्यामुळे मी काही संकल्प करत नाही. मी याला मूर्खपणा समजतो. ही एक सवय असते, एक लाइफस्टाइल असते ती तुम्ही बदलू शकत नाही.

सलमान-अजय दोघांनाही केले होते अप्रोच

फराह खान आणि रोहित शेट्‌टीच्या सहकार्याने बनत असलेल्या 'हम पांच' चित्रपटासाठी सलमान आणि अजय दोघांनाही अप्रोच करण्यात आले होते. दोघांनाही एकाच भूमिकेसाठी नॅरेशन देण्यात आले होते. सूत्रानुसार..., सलमानने स्क्रिप्टचे काही नॅरेशन ऐकले आहे. दुसरीकडे अजयलादेखील नॅरेशन देण्यात आले आहे. कारण अजयने निर्मात्यांना 'आरआरआर' नंतरच दुसरा प्रोजेक्ट करणार असल्याचे सांगितले आहे. तर सलमान 'राधे' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.