आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार हिमवृष्‍टीमध्‍येही या घरावर जमा झाला नाही बर्फ, संशय आल्‍यावर पो‍लिसांनी मारला छापा; समोर आले हे सत्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्लेम - कडाक्‍याच्‍या थंडीत पुर्ण परिसरामध्‍ये बर्फ जमा झाला असेल आणि एका घरावर बर्फाचे नामोनिशाणही नसेल, तर कोणालाही याचे आश्‍चर्यच वाटेल. तीन वर्षांपूर्वी नेदरलँडमध्‍ये काहीसे असेच दृश्‍य पोलिसांना दिसले होते. जोरदार हिमवृष्‍टीमध्‍येही एका घरावर बर्फाचा कणदेखील नव्‍हता. शंका आल्‍यावर या घराची तपासणी केली असता त्‍यांना घरामध्‍ये चक्‍क गांजाची शेती चालू असल्‍याचे दिसले.


हिट लॅम्‍पमुळे विरघळत होता बर्फ
- एम्‍सटर्डमपासून काही अंतरावर असणा-या हार्लेम शहरातील ही घटना आहे. येथे जोरदार हिमवृष्‍टी होत असतानाही पोलिसांना एका घरावर अजिबात बर्फ जमा नसल्‍याचे दिसले.
- घरात काहीतरी गडबड असल्‍याची शंका येताच पोलिसांनी घरावर छापा मारला. आतमध्‍ये हीटलॅम्‍प चालू असल्‍याचे त्‍यांनी पाहिले. यामुळे घराच्‍या छतावरील बर्फ वितळून जात होता.
- हे हिट लॅम्‍प इमारतीतील गांजाच्‍या रोपट्यांसाठी लावण्‍यात आले होते. कारण कडाक्‍याच्‍या थंडीतही 29 अंश सेल्सिअस  एवढे तापमान मेंटेन केले जाऊ शकेल व इमारतीत गांजाची शेती केली जाऊ शकेल.
- मात्र इमारतीत गांजाचे किती रोपटे होते व किती प्रमाणात गांजा ताब्‍यात घेण्‍यात आला, हे अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकलेले नाही.
- नेदरलँडमध्‍ये घरात पाचहून अधिक गाजांची रोपटे लावणे अपराध आहे. तसेच एका व्‍यक्‍तीला 5 ग्रामहून अधिक गांजा स्‍वत:कडे ठेवता येत नाही.
- या प्रकारणामुळे नेदरलँडमध्‍ये बेकायदेशीररीत्‍या घरात गांजाची शेती करणा-यांविरोधात पोलिसांना एकप्रकारे क्‍लूच मिळाला आहे. कारण या घटनेनंतरच संशयाच्‍या आधारावर पोलिसांनी एका घरावर धाड टाकली असता त्‍यांना बेडरूमध्‍ये 88 गांजाची रोपटे लावले असल्‍याचे समजले.  

 

 

  

बातम्या आणखी आहेत...