आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गांवरील वाहने अडवून दरोडा टाकणारे दाेघे कोल्हारमध्ये गजाआड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महामार्गांवर वाहने अडवून लूट करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. मात्र, त्यानंतर ते फरार झाले होते. संदीप ऊर्फ खुखांर विजय वाघमारे (३०, अचानकनगर, खंडाळा, श्रीरामपूर) व मोहंमद मौलाना ऊर्फ अब्दुल बशीर मन्सुरी (४०, मोरगेवस्ती, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. 


२०१७ मध्ये या आरोपींनी लोणावळा येथील आयटीसी कंपनीचा सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर चालकासह पळवला होता. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शाहरुख रज्जाक शेख (निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर) याला स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली आहे. आरोपी संदीप व मोहंमद हे राहाता तालुक्यातील काेल्हार येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना कोल्हार येथे सापळा रचून ताब्यात घेतले. 


अारोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी संदीप हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून हे दोघेही फरार होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या आरोपींच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस उपनिरीक्षक सचिन खामगळ, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पाेलिस हेड कॉन्स्टेबल मोहन गाजरे, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, रोहिदास नवगिरे, योगेश सातपुते, विजय ठाेंबरे, संतोष लोंढे, सचिन कोळेकर आदींनी ही कामगिरी केली. 

 

बातम्या आणखी आहेत...