क्राइम / महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात अवैध धंद्याना उत; उशिरा का होईना पोलिसांची कारवाई

कारवाईत 2 लाखांपेक्षा अधिकचा मुद्दे-माल जप्त

निलेश पाटील

Sep 20,2019 08:13:27 PM IST

नवापूर- तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात अवैध धंद्यांना उत आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात नव्याने नियुक्त झालेले पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जिल्ह्यात अवैध संपूर्णपणे बंद केले होते. तरीदेखील नवापूर तालुक्यातील सीमावर्ती भागात सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. आता उशीरा का होईना, पण नवापूर पोलिसांना धंदे बंद करण्याची जाग आली.


तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या भामरमाळ येथील अहवा फाट्याजवळ रस्त्याचा बाजुला असलेल्या शेतातील कच्या शेडमध्ये काही लोक "झन्ना-मन्ना" नावाच्या जुगारावर पैसे लावत असल्याची गोपनीय माहिती नवापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून धाड टाकली आणि दिलीप चेमट्या गावीत (रा. भामरमाळ),प्रकाश सुरेश पवार (रा. मोठी कसाट, जिल्हा डांग गुजराथ) आणि अशोक मोना गावीत (रा. प्रतापपुर ता. नवापूर) अशा तिघांना ताब्यात घेतले. यावेळी इतर 5 ते 7 जणांनी उसाचा आडोसा घेऊन पळ काढला.


सदर ठिकाणाहून वीज हजार रुपयांच्या 10 मोटार सायकली व ताब्यातील आरोपींकडुन 6 हजार 500 रुपये रोख असा एकूण 2 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबार पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नासीर पठाण, गुमान पाडवी, नरेंद्र नाईक, शांतीलाल पाटील, रितेश इंदवे, आदीनाथ गोसावी, योगेश तनपुरे, योगेश थोरात यांनी केली. सध्या पुढील तपास उपनिरीक्षक नासीर पठाण करत आहेत.

लक्कडकोट आंतरराज्य जुगार अड्डा सुरूच

नवापूर तालुक्यातील लक्कडकोट गावातील आंतरराज्यीय जुगाराचा अड्डा बंद करण्यास जिल्हा पोलिस प्रशासनाला यश आले नाहीये. नवापूर पोलिस एखादी किरकोळ कारवाई करून मोकळे होतात, परंतू येथील मोठे मातब्बर जुगार किंग मोकाट आहे. नाशिक, मुंबई नंदुरबार येथील वरिष्ठांची टीम कारवाई करण्यास गेली तरी स्थानिक कर्मचारी बातमी लीक करून जुगाऱ्यांना सांगतात.

X
COMMENT