आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट न घातल्याबद्दल पोलिसांनी कारचालकास आकारला ५०० रु. दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगड : मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या रकमेच्या पावत्या देण्यात येत आहेत. यात काही अजब प्रकारही समोर आले आहेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील अलिगड येथे घडले असून वाहतूक पोलिसांनी कारचालकास हेल्मेट न घातल्याबद्दल पावती दिली आहे. ऑनलाइन पावती असून त्याला ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. दंडाची पावती मिळालेल्या पियूष वार्ष्णेय यांनी सांगितले, माझे वडील सुरेश यांच्या नावे दंडाची पावती आली आहे. ती २७ ऑगस्ट रोजीची आहे. पावतीत माझ्या कारचा क्रमांक आहे. अाता दंडाच्या भितीने मी कारमध्येही हेल्मेट घालून बाहेर पडतो आहे. पियूष हेल्मेट घालून पोलिस अधिक्षकांना भेटले आणि तक्रार दिली. यावर एसपी अजिज उल हक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सदर पावती चुकीने दिली गेलेली असल्यास ती रद्द करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ओडिशात ट्रकचालकास ८६५०० रुपये दंड
भुवनेश्वर : ओडिशातील संबलपूर जिल्ह्यातील एका ट्रक चालकास नव्या मोटार वाहन कायद्याचा मोठा फटका बसला. आजवर देशातील सर्वात मोठा दंड असल्याचे सांगण्यात येते. या चालकास ८६ हजार रुपये दंडाची पावती देण्यात आली. संबलपूर परिवहन अधिकारी ललित मोहन बेहरा यांनी सांगितले, हे प्रकरण गेल्या आठवड्यातील आहे. चालक अशोक जाधव याने एका अनधिकृत व्यक्तीस ट्रक चालविण्यास दिली. (पाच हजार रु.) विना परवाना ड्रायव्हिंग (५ हजार) ओव्हरलोडिंग (५६ हजार), चुकीच्या पद्धतीने सामान ठेवले (२० हजार) सामान्य गुन्हा (५०० रु.) दंड आकारण्यात आला आहे. चालकाने अधिकाऱ्याशी पाच तासांहून अधिक काळ वाद करूनही ७० हजार रुपये दंड भरला. या पावतीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...