आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Constable Arrested For Making Video Of Woman During Her Bath In Amar Nath Yatra

अमरनाथ यात्रेदरम्यान महिलेचा अंघोळ करताना काढत होता व्हिडिओ, पोलिस कॉन्सटेबलला घेतला ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- अमरनाथ यात्रेदरम्यान एका महिलेचा अंघोळ करताना कथीतरित्या व्हिडिओ काढल्याच्या आरोपाखाली पोलिस कॉन्सटेबलला अटक करण्यात आली आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भारतीय रिजर्व पोलिसांच्या 19व्या बटालीअनचे कॉन्सटेबल तारीक अहमदवर कलम 354(महिलेच्या अब्रूला नुकसान पोहचविणे)अंतर्गत त्रिकूटा नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही वेळानंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आले. पोलिसांनी सांगितल्यानुसार अहमद बुधवारी रात्री रेल्वे स्टेशनवरील शिबिराच्या स्नानगृहात जाऊन आपल्या मोबइच्या साहाय्याने व्हिडिओ काढत होता.


महिलेला जेव्हा कळाले, तेव्हा तिने आरडा-ओरड करून लोकांना जमा केले. त्यानंतर लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन कले. पोलिसांनी त्याला औपचारिकरीत्या अटक करून त्याच्याकडील मोबाईल जप्त केला. मंगळवारपर्यंत अमरनाथ गूफेत 11,456 भाविकांनी बाबा अमरनाथचे दर्शन घेतले. पोलिसांनी सांगितले की, "4,694 यात्रेकरूंचा एक ग्रुप आज सकाळी भगवती नगर यात्री निवास स्थानावरून काश्मीर घाटी च्या पहिल्या सुरक्षा कॅम्पकडे रवाना झाला. यात 2,052 बालटाल आधार शिबीर आणि 2,642 पहलगामकडे रवाना झाले.