आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यातील पोलिस कॉन्सटेबलची आत्महत्या, राहत्या घरात गळफास घेऊन संपवले आयुष्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- माढा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल सुरेंद्र अजंता कटकधोंड(वय 30) यानी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी रविवारी पोलिस वसाहतीमधील आपल्या राहत्या घरात 9:30 वाजता सिलींग पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.




सुरेंद्र हे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातून माढा पोलिस स्टेशनमध्ये मे महिन्यात रुजू झाले होते.  सुरेंद्र पोलिस वसाहतीतील आपल्या खोलीत होते, तर त्यांच्या पत्नी व दोन  मुले वसाहती बाहेरील प्रागंणात बसले होते. दरम्यान सुरेंद्र यानी हॉलमध्ये साडीच्या मदतीने  फॅनला गळफास घेतला. 


पोलिस कॉलनीत असलेल्या महिलांना सुरेंद्र हे पख्याला लटकत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी घटना त्यांच्या पत्नी आणि माढा पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सुरेंद्र यांचा पंचनामा केला आहे.  आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान पोलिस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरून 12 ऑगस्ट रोजी सुरेंद्र यांचा एका पोलिस अधिकाऱ्यासोबत वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. 




घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यानी घटनास्थळी भेट दिली. सुरेद्र यांच्या पश्चात 3 वर्षाची मुलगी, पाच वर्षीय मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.