आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Constable Sleeping But Statue Of Maharana Pratap Stolen In Jodhpur Rajasthan

6 महिन्यांपासून करत पोलिस करत होत महाराणा प्रताप यांच्या मूर्तीची रक्षा, पलंग टाकून रात्रभर झोपायचे पोलिस, सकाळी पाहिले तर मूर्ती नव्हती जागेवर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर(राजस्थान)- जिल्ह्यातील बेदू गावातील चौकात बसवण्यात आलेली महाराणा प्राताप यांच्या मूर्तीची कोर्टाच्या आदेशावरून मागील सहा महिन्यांपासून पोलिस रक्षा करत होते पण शनिवारी रात्री अचानक कोणीतरी ती चोरून नेली. अंदाजे दोन फुटांची आणि वजनाने हलकी असल्यामुळे त्या मूर्तीला कोणीही उचलून नेउ शकत होते, त्यामुळे रात्री कोणी मूर्ती उचलून नेली याबाबत त्या सुरक्षा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही माहित नाही. सकाळी घटनेची माहिती मिळताच गावातील लोक जमा झाले. प्रकरणाची गंभीरता पाहून वरिष्ठ आधिकारी घटनास्थळी पोहचले आणि चोराला लवकरात लवकर पककडण्यात येइल असा विश्वास गावकऱ्यांना दिला. 

 


24 तास दोन काँस्टेबल तैनात तरीदेखील झाली चोरी
6 महिन्यांपूर्वी चौकात कोण्या दुसऱ्या महापुरूषाची मूर्ती लावण्यात येइल या भीतीपोटी रातोरात महाराणा प्रताप यांची मूर्ती तेथे लावण्यात आली. नंतर हे प्रकरण कोर्टात गेले आणि कोर्टाच्या आदेशावरून दोन पोलिस या मूर्तीची दिवस रात्र निगरानी करू लागले. पण पोलिसाचा डोळ लागला आणि रात्री मूर्ती चोरण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...