आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Cut A Rs 6100 Invoice For The Scooty Of A Congress Leader Who Took Priyanka Gandhi

प्रियंका गांधींना स्कुटीवर घेऊन जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला पोलिसांनी ठोठावला 6100 रुपयांचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानचे काँग्रेस आमदार धीरज गुर्जर प्रियंका गांधींना स्कुटीवर बसवून आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी गेले होते

लखनऊ- काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींना शनिवार संध्याकाळी ज्या स्कूटीवर बसवून रिटायर्ड आयपीएस अधिकारी दारापुरी यांच्या घरी घेऊन जाण्यात आले होते, त्यावर आता लखनऊ पोलिसांनी 6100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही स्कुटी राजस्थानचे काँग्रेस आमदार धीरज गुर्जर चालवत होते.पोलिसांनी सांगितल्यानुसार, ड्रायव्हिंग लायसंस नसल्यामुळे 2500 रुपये, विना हेलमेट गाडी चालवल्यामुळे 500 रुपये, ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 300 रुपये, खराब नंबर प्लेटमुळे 300 रुपये आणि चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे 2500 रुपयांचा दंड लागला आहे.

दारापुरी यांच्या घरी जाताना वाद झाला होता

शनिवारी संध्याकाळी प्रियंका गांधींनी लखनऊमध्ये पाई चालत प्रदर्शन केले होते. पोलिसांना याची माहिती लागताच मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी प्रियंका यांनी आरोप लावला होता की, त्यांना दारापुरी यांच्या घरी जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांना धक्काबुकीदेखील झाली.

बातम्या आणखी आहेत...