आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील सिनेमागृहात तरूण-तरूणींचे अश्लील चाळे, दामिनी पथकाने धाड टाकून 10 जोडप्यांना घेतले ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- महाविद्यालयीन मुले-मुली सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात असतात. पण धुळ्यातील सिनेमागृहात अश्लील प्रकार घडला आहे. तरुण-तरुणी धुळ्यातील सिनेमागृहात अश्लील चाळे करताना पोलिसांना आढळले. पोलिस विभागातील दामिनी पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. जोडप्यांकडून सिनेमागृहात अश्लील चाळे केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून सिनेमागृहात प्रवेश केला आणि 10 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले, पण या कारवाई दरम्यान काहीजण पळून गेले.

 

धुळ्यातील ज्योती थिएटरमध्ये हा प्रकार सुरू होता. थिएटरमध्ये जोडप्यांना 200 रुपये प्रति तास या रेटने विशेष बॉक्सची सोय करुन दिली जायची. या जागेवर जोडपी अश्लील चाळे करायचे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी दामिनी पथकाच्या मदतीने सापळा रचून कारवाई केली.

 

पोलिस दलातील एक महिला आणि पुरुष कर्मचाऱ्याने बनावट जोडपे म्हणून थिएटरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जोडपे थिएटरमध्ये अश्लील चाळे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यानतर त्यांनी पोलिसांना धाड टाकण्यास सांगितले. एकूण आठ जोडपे होते. यापैकी सहा जण पळून गेले, तर 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.