आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे पार्टीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा तो पोलिस उपमहानिरीक्षक निलंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबईतील तळोजा पोलिस ठाण्यात आयपीएस अधिकारी निशिकांत मोरे या पाेलिस उपमहानिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा व विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता.

माेरे व मुलीचे वडील मित्र आहेत. 5 जून राेजी या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत माेरे अचानक आला व त्याने दारूची मागणी केली. मुलीच्या नातलगांनी केक कापून तिच्या चेहऱ्याला लावला, त्यावेळी माेरेने या मुलीशी लगट करून तिच्या चेहऱ्यावर लावलेला केक बाेटाने काढून दाेन-तीन वेळा चाटला. हा प्रकार काही जणांनी माेबाइलवर शूटही केला. हा प्रकार माेरेच्या लक्षात आल्यानंतर त्याने हा व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले, मात्र त्यांनी ऐकले नाही. माेरेविराेधात गेल्या सहा महिन्यांपासून तक्रार दाखल करण्यासाठी हे कुटुंबीय पाेलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत होते, मात्र त्यांना दाद मिळत नव्हती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. व्हिडिओ क्लिपिंगच्या आधारे माेरेविराेधात गुन्हा दाखल केला आणि आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.