Home | Maharashtra | Pune | police did action against 13 accused who demanded ransom from minister Mahadev Jankar

मंत्री महादेव जानकरांना खंडणी मागणाऱ्या १३ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई

प्रतिनिधी | Update - May 23, 2019, 09:28 AM IST

यापूर्वीही आरोपींवर खुनासह अनेक गुन्हे

 • police did action against 13 accused who demanded ransom from minister Mahadev Jankar

  पुणे - राज्याचे दूग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. याशिवाय इंदापूर तालुक्यातील सोमा राऊत गँगवरही मोक्कांतर्गत कारवाई झाली.


  जानकर प्रकरणात सचिन ज्ञानेश्वर पडळकर, डाॅ. इंद्रकुमार देवराज भिसे, दत्तात्रय पांडूरंग करे, विकास शिवाजी अलदर, तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे , बिरुदेव लक्ष्मण कारंडे , सुशांत दादासाहेब करे (रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा), दीपक विठ्ठल जाधव (रा. वडजल, ता. माण), नितीन राजेंद्र पिसे (रा. म्हसवड, ता. माण) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या ९ जणांसह जगन्नाथ जानकर ( रा. पळसावडे, ता. माण), विनायक मासाळ व राजू अर्जून आणि रमेश कातुरे (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचाही समावेश आहे. या चार आरोपींची पूर्ण नावे पोलिसांकडे नाहीत. त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.


  ९ मे रोजी आरोपींना खंडणीची रक्कम स्वीकारताना बारामतीत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अण्णासाहेब बळवंत रुपनवर यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींनी ४ मे रोजी बारामतीतील कृष्णसागर हाॅटेलमध्ये तर ६ मे रोजी स्वारगेट येथील नटराज हाॅटेलात फिर्य़ादीला बोलावून जानकर व दोडतले यांची बदनामीकारक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू, दोडतले यांना मारहाण करून त्यांचे हातपाय तोडू, अशी धमकी देत फिर्यादीलाही त्या प्रकरणात गोवण्याची भीती दाखवली होती.

  यापूर्वीही आरोपींवर खुनासह अनेक गुन्हे
  या टोळीतील पडळकर विरोधात खूनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, सरकारी कामात अडथळा, डाॅ. भिसे विरोधात खंडणी, कट रचून खूनाचा प्रयत्न, करे विरोधात खंडणी, सरकारी कामात अडथळा, तर अलदर विरोधात चोरी, जगन्नाथ जानकर व राजू अर्जून यांच्यावर मारामारी, बेकायदा गर्दी जमाव जमवणे, व अन्य गुन्हे दाखल आहेत.

Trending